वणव्याचे ग्रहण दूर करण्यासाठी वनविभागाने जागृतीबरोबरच कारवाईची मोहीम गतिमान केली आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी रात्री सव्वासात वाजेच्या सुमारास काळगावच्या अंबारी भागातील वनहद्दीलगतच्या फार्महाऊस परिसरात दोघांनी आग लावली होती. वाळलेले गवत व वारा यामुळे क्षणात आग फैलावली. यात जंगल कक्ष क्रमांक ६२२ मध्ये आग लागली. त्यामध्ये साडेपाच हेक्टर परिसरात असलेल्या आकेशिया, साग, आवळा यासह लहान झाडे-झुडपे, पालापाचोळा, गवत जळून खाक झाले. परिसरामध्ये कार्यरत असलेल्या वन कर्मचाऱ्यांनी याप्रकरणी दोघांवर गुन्हा नोंदविला असून, लवकरच त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. वणवा विझविण्यासाठी वनकर्मचारी व ग्रामस्थांनी प्रयत्नांची शिकस्त केली. ब्लोअर मशीन व झाडांच्या डहाळ्यांच्या मदतीने आग विझवण्यात आली. सुदैवाने पुढील हानी टळली.
काळगावचा वणवा थेट जंगलात घुसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 4:39 AM