फलटण : काँग्रेसची घोटाळ्याची काळी पाप जनतेला कळली म्हणुन जनतेने लाथ मारून त्यांना सत्तेतून हाकलून दिले आहे. एका वर्षात मोदी सरकारची गाडी कोणत्या दिशेने ध्येय धोरणे घेऊन पुढे चालली आहे. हे लोकांना समजले आहे. एका वर्षात एक रुपययांचा भ्रष्टाचाराचा आरोपही सध्याच्या सरकारवर नाही. त्यामुळे पुढची पंचवीस वर्ष सत्तेत जाण्याचे विसरा, असा घणाघात हल्ला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी केला.मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल जनकल्याण पर्व मोहीम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत गजानन चौकात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार दिलीप येळगावकर, दत्ताजी थोरात, अनुप सुर्यवंशी, जिल्हाउपाध्यक्ष अनुप शहा, शहराध्यक्ष दादासाहेब चोरमले, रत्नप्रभा हिंगे, नयना भगत यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.बापट म्हणाले, या देशातील जनतेने भारतीय जनता कौल दिला. आमचे सरकार सत्तेत आले. सरकार बदल्यावर लोकांची अपेक्षा असते काय मिळाले. आम्ही सत्तेत येताना सांगितले होते. अच्छे दिन आयेंगे. हा देश कृषीप्रधान देश आहे. या देशाचा खरा स्वामी शेतकरी आहे. म्हणून शेतकरी जगला तर शेतकऱ्याला भाव मिळाला. आत्महत्या थांबल्या पाहिजेत, यासाठी जे. जे. लागेल ते ते देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. शेतकरी अनेक नैसर्गिक आपत्तीना तोंड देत असतो. कधी पाणी नाही म्हणून कधी अवकाळी अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मागे सरकार खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. मागील सरकारने शेतकऱ्यांसाठी नुसत्या घोषणा केल्या. आम्ही ज्यावेळी राज्यात सत्तेवर आलो. अनेक आव्हाने उभी होती. पण शेतकऱ्यांना प्राधान्य देऊन गारपीट असेल, अवकाळी असेल, वादळी असेल त्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आमच्या सरकारने तातडीने मदत केली.काँग्रेस सरकारने या देशात कोळसा सुद्धा खायचा सोडला नाही. १२ लाख कोटीचा घोटाळा त्यांनी करून स्वत:चे तोंड काळे केले. या खाणीचा मोदी सरकारने ई टेंडरिंग करून लिलाव केले व केंद्र सरकारच्या तिजोरीत दोन लाख कोटी जमा झाले. विरोधक विचारतात की काळा पैसा आणण्याचे काय झाले. परदेशातील पैशाची माहिती घेण्यासाठी कायदा करावा लागतो. (प्रतिनिधी)फलटणमध्ये येऊन रामराजेंचे कौतुकसिंचनाच्या बाबती बोलतान बापट म्हणाले,जलसंपदाचे काम रामराजे पाहत होते. पण सज्जन रामराजेंकडील खाते अजीत पवारांनी काढून घेतले. खाते रामराजेंकडे होते तरी,जलसंपदा मधील जल रामराजेंकडे.....संपदा अजीत पवारांकडे.. कृष्णा खोऱ्यातील कृष्णा रामराजेंकडे.....खोरे अजित पवारांकडे असे म्हणताच सभा स्थळी एकच हशा पिकला. फलटणमध्ये येऊन रामराजेंचेवर टीका न करता एक प्रकारे कौतुकच करून बापट यांनी त्यांच्याशी असलेले आपले मैत्रीचे संबध जपल्याची चर्चा सभा स्थळी होती
पुढची पंचवीस वर्ष सत्तेत जाण्याचे विसरा
By admin | Published: May 31, 2015 10:13 PM