शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
4
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
5
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
6
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
7
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
8
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
9
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
10
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
13
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
14
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
15
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
16
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
17
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
18
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

अखेर आनंदराव पाटील 'निमंत्रित' भाजपवासी! 

By प्रमोद सुकरे | Published: May 06, 2023 9:53 PM

काँग्रेसच्या माजी आमदारांची भविष्यातील वाटचाल स्पष्ट 

कराड : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे पासून दुरावलेले काँग्रेसचे माजी आमदार आनंदराव पाटील अखेर भाजपवासी झाली आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या भाजपच्या प्रदेश कार्यकारणीत निमंत्रित सदस्य म्हणून त्यांचे नाव घेण्यात आले आहे. त्यामुळे आपल्या पुढील वाटचालीबाबत वेळोवेळी उत्तर देणे टाळणाऱ्या आनंदराव पाटील यांच्या भूमिकेवर शिक्कामोर्तबच झाले आहे.

आनंदराव पाटील हे मूळचे कोयनानगर परिसरातले. मात्र कोयना धरण उभारणीच्या वेळी विस्थापित झाल्यानंतर त्यांचे पुनर्वसन कराड तालुक्यातील विजयनगर येथे झाले. आनंदराव पाटील यांनी तत्कालीन खासदार प्रेमीलाताई चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेस पासून आपली राजकीय कार्यकिर्द  सुरू केली. पुढे अनेक वर्ष ते सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहिले. दरम्यानच्या काळात त्यांनी कराड उत्तर विधानसभा मतदार संघातून दोन वेळा काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवली. पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती.

पृथ्वीराज चव्हाण केंद्रात पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री झाल्यावर आणि त्यानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून आल्यावर आनंदरावांना 'मिनी मुख्यमंत्री' म्हणून ओळखले जाऊ लागले होते.मग ते विधान परिषदेवर आमदारही झाले. पण गत विधानसभा निवडणुकीपूर्वीच त्या दोघांच्यात अंतर पडले. त्याचे कारण निश्चित समोर आलेच नाही. पण आनंदराव पाटील विधानसभेच्या प्रचारात कुठे दिसलेच नाहीत. त्यांचे पुतणे सुनील पाटील व मुलगा प्रताप पाटील मात्र भाजपच्या प्रचारात दिसत होते.पण त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनीच बाजी मारली.

त्यानंतर वेळोवेळी आनंदराव पाटलांनी आपली पुढील राजकीय वाटचाल लवकरच मांडू असे माध्यमांना सांगितले खरे, पण ते जाहीर केलेच नाही. नुकत्याच झालेल्या कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील, भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांच्यासोबत ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यावेळीही माध्यमांनी तुम्ही राष्ट्रवादी की भाजप म्हणून यात सहभागी झाला आहात? असे छेडले. पण सहकारातील निवडणुका पक्षीय नसतात; आम्ही आघाडी म्हणून लढत आहोत असे सांगत त्यांनी उत्तर देणे टाळले.

पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच महाराष्ट्र प्रदेश भाजपची जम्बो कार्यकारणी जाहीर केली. त्यात आनंदराव पाटील यांना निमंत्रित सदस्य म्हणून स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे आनंदराव पाटील भाजपचे सदस्य झाले आहेत, ते भाजवासी झाले आहेत यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.

कराडला झुकते माप 

भाजपच्या प्रदेश कार्यकारणीत कराडच्या ७ जणांना स्थान मिळाले आहे. त्यात उपाध्यक्ष - विक्रम पावस्कर, सचिव- अँड. भरत पाटील तर निमंत्रित सदस्य म्हणून डॉ. अतुल भोसले, शेखर चरेगावकर, आनंदराव पाटील रामकृष्ण वेताळ, स्वाती पिसाळ यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे या कराडकरांची जबाबदारीही निश्चितच वाढली आहे.

सन आणि सैनिक अगोदरच दाखल

माजी आमदार आनंदराव पाटील यांचा मुलगा प्रताप पाटील, पुतणे बाजार समितीचे माजी उपसभापती सुनील पाटील यांनी गत विधानसभा निवडणुकीपूर्वीच मुंबईत जाऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र आनंदराव पाटील यांनी स्वतः कुठलीच भूमिका मांडली नव्हती.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा