सातारा : बार कौन्सिल ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष, देशात नावाजलेले फौजदारी वकील, लाल बावटा युनियनचे अध्यक्ष ॲड. कॉ. धैर्यशील पाटील यांचे निधन झाले.डि.व्ही दादांच्या रुपाने न्यायक्षेत्रातील बार ॲन्ड बेंच मधील एक अभ्यासू व्यक्तीमत्व गमावले आहे. आंग्लभाषेवर पकड असलेल्या दादांचे न्यायालयामधील विविध खटल्यांमधील केले जाणारे अर्ग्युमेंट ऐकण्यासाठी, वकील मंडळींसह अनेकांची गर्दी होत असे.प्रख्यात विधीज्ञ आणि भारताच्या बार कौन्सिल या प्रतिष्ठेच्या आणि महत्वाच्या पदावर अध्यक्ष म्हणून काम करुन सुध्दा त्यांच्या दैनंदिन जीवनात, सामान्य व्यक्तींविषयी विशेष जिव्हाळा होता. दादांनी त्यांच्या आई-वडीलांचा म्हणजेच माजी आमदार आणि निष्णात वकील कॉ. व्ही. एन. पाटील आणि हेमलताबाई पाटील यांचा सामाजिक वारसा मोठ्या निष्ठेने पुढे चालवला.गोरगरिब, कष्टकरी, आणि पिचलेल्या अनेकांना दादा निस्वार्थीपणे न्याय मिळवून देतच तथापि त्यांना अनेक प्रकारांनी सहाय्य सुध्दा करीत असत. आपण केलेल्या सहाय्य किंवा मदतीची वाच्यता सुध्दा ते कधी कोठे करीत नसत हे त्यांचे वेगळे वैशिष्ठ्य म्हणावे लागेल. त्यांच्या जाण्याने कायद्याच्या विश्वामधील कधीही भरुन येवू न शकणारे प्रचंड नुकसान झाले आहे.
बार कौन्सिल ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष ॲड. धैर्यशील पाटील यांचे निधन
By दीपक शिंदे | Published: September 14, 2022 2:09 PM