शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
3
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
4
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
5
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
6
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
7
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
8
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
9
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
10
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
11
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
12
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
13
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
14
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
15
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
16
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
17
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
18
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
19
सोमवारनंतर मतदारसंघांतील चित्र होणार स्पष्ट; विधानसभेच्या प्रचारासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस!
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा

माजी सरपंचाला पोलीस पाटलाकडून घरात घुसून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 4:39 AM

चाफळ : ‘ग्रामपंचायत कामकाजात हस्तक्षेप करू नका,’ असे बोलल्याचा राग मनात धरून खराडवाडी ता.पाटण येथील पोलीस पाटलानेच हातात कायदा ...

चाफळ : ‘ग्रामपंचायत कामकाजात हस्तक्षेप करू नका,’ असे बोलल्याचा राग मनात धरून खराडवाडी ता.पाटण येथील पोलीस पाटलानेच हातात कायदा घेत घरात घुसून चक्क माजी सरपंचासह घरातील व्यक्तींना दांडक्याने मारहाण केली. लक्ष्मण निवृत्ती खराडे असे गंभीर जखमी झालेल्या माजी सरपंचाचे नाव आहे. याबाबत माजी सरपंच लक्ष्मण खराडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पोलीस पाटील अविनाश उर्फ आनंदा सुरेश कुंभार, त्याचा भाऊ योगेश कुंभार, शहाजी तानाजी साळुंखे (सर्व रा. खराडवाडी), पंकज संभाजी मोरे (रा.सूर्याचीवाडी) व अन्य दोन जणांनी शुक्रवार दि. २३ रोजी रात्री साडेआठचे सुमारास संगनमताने माझ्या घरात घुसून लाकडी दांडक्याने मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली, तसेच पत्नी जयश्री व मुलगा अक्षय यालाही मारहाण केली. अचानकपणे झालेल्या हल्ल्यामुळे खराडे कुटुंबीय पूर्णपणे हादरून गेले आहेत. या प्रकरणी उंब्रज पोलीस स्टेशनला दोन्ही बाजूकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून, अधिक तपास अमृत आळंदे करीत आहेत.

दरम्यान, माजी सरपंच लक्ष्मण खराडे यांनी दमदाटी केल्याबद्दल उंब्रज पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला जात असताना, तोरस्करवाडीजवळ अडवून मारहाण केली, अशी तक्रार खराडवाडीचे पोलीस पाटील अविनाश उर्फ आनंदा सुरेश कुंभार यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात नोंदविली आहे.