सातारा : पाटण तालुक्यातील अनुतेवाडी (जिंती) येथे रस्त्याचे काम सुरू असताना जेसीबी आणि पोकलेन मशीनमधून ऑइल चोरून नेल्याप्रकरणी झारखंड येथील चौघांना ढेबेवाडी पोलिसांनी अटक केली. रणजित दास, अकरम अन्सारी, इरशार अन्सारी, एकरामूल अन्सारी अशी अटक झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मनोज रघुनाथ पाटील (वय ४२, रा. बनपुरी, ता. पाटण) हे ठेकेदार असून त्यांच्या अनुतेवाडी (जिंती) येथील रस्त्याच्या कामासाठी जेसीबी आणि पोकलेन लावले आहेत. यातून रणजित रामेश्वर दास, अकरम अली अन्सारी, इरशार दिलमहंमद अन्सारी, एकरामूल नईम अन्सारी (सध्या रा. अनुतेवाडी, जिंती, ता. पाटण. मूळ रा. हजारीबाग, राज्य : झारखंड) या चौघांनी बुधवार, दि. १३ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास आठ हजार ४०० रुपये किमतीचे १०५ लीटर डिझेल चोरून नेले. डिझेलचोरीचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर मनोज पाटील यांनी या चौघांविरोधात ढेबेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर चारही परप्रांतीयांवर गुन्हा दाखल झाला होता. यानंतर, ढेबेवाडी पोलिसांनी या चौघांनाही अटक केली आहे. अधिक तपास सहायक फौजदार आर.एस. पानवळ हे करत आहेत.