संजय पाटील ।क-हाड : कोरोना जीवघेणा; पण तरीही ‘त्यांनी’ माघार घेतलेली नाही. ते लढतायत. रुग्णांशी थेट संपर्कात येतायत. फेस शिल्ड, मास्क, ग्लोव्हजच्या भरवशावर ते जीवाची बाजी लावतायत आणि एवढ्यावरच न थांबता कोरोना संशयित रुग्णांची माहितीही ते प्रशासनापर्यंत पोहोचवतायत. कºहाड तालुक्यात सोळा गावांमध्ये ‘सीझेड सर्व्हे’साठी असे ४१० ‘फायटर्स’ राबतायत.
क-हाड तालुक्यात तांबवे गावामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर गत दोन महिन्यांत वेगवेगळ्या गावांमध्ये बाधितांची संख्या वाढत गेली. ज्यावेळी तांबवेत रुग्ण आढळला, त्यावेळी प्रशासनाने केलेली कार्यवाही आणि सध्याची कार्यवाही यामध्ये मोठी तफावत आहे. सध्या प्रशासनकडे बाधित रुग्ण आढळल्यानंतर करावयाच्या उपाययोजनांचा आराखडा तयार आहे. यापूर्वी घेतलेली खबरदारी आणि अंमलबजावणी केलेल्या उपाययोजनांचा प्रशासनाला पूर्वानुभव आहे. तसेच वैद्यकीय पथकासह अगदी आशा सेविकांपर्यंत सर्वजण या प्रक्रियेत सुरुवातीपासून आहेत. त्यामुळे बाधित रुग्ण आढळला की केली जाणारी प्रत्येक उपाययोजना मार्गदर्शक सूचनांच्या प्रक्रियेनुसारच केली जाते.
मुळातच एखाद्या गावात बाधित रुग्ण आढळला की प्रशासनाकडून ते गाव ‘कंटेन्मेंट झोन’ (सीझेड) म्हणून घोषित करण्यात येते. या गावात सॅनिटायझेशन करण्याबरोबरच आशा सेविकांकडून सर्व्हे सुरू केला जातो. जोपर्यंत कंटेन्मेंट झोन आहे, तोपर्यंत दररोज आशा सेविका त्या गावातील किंवा भागातील प्रत्येक घरात जाऊन ग्रामस्थांच्या आरोग्याची माहिती संकलित करतात. कोरोनाची लक्षणे आहेत का, याची खातरजमा त्यांच्याकडून केली जाते. तसेच ती माहिती आॅनलाईन भरून प्रशासनाला पाठविली जाते.
या आशा सेविकांच्या दैनंदिन सर्व्हेचा आढावाही पर्यवेक्षकांकडून घेतला जातो. तालुक्यातील सोळा गावांतील कंटेन्मेंट झोनमध्ये (सीझेड) सध्याही अशाच पद्धतीने सर्व्हे सुरू असून, प्रशासनातील अखेरची कडी असलेले फायटर्स य सर्व्हेसाठी जीव धोक्यात घालून प्रत्येक घराला भेट देतायत.
खबरदारी घेऊनही धोका कायमकंटेन्मेंट झोनमधील गावांत सर्व्हे करणाऱ्या आशा सेविका तसेच इतर कर्मचाऱ्यांना सुरक्षेसाठी फेस शिल्ड, ग्लोव्हज, मास्क, सॅनिटायझर पुरवले जाते. तसेच सोशल डिस्टन्स ठेवूनच माहिती संकलित करण्याबाबतच्या सूचना आहेत. मात्र, एवढे करूनही सर्व्हे करणाºया सेविका आणि इतर कर्मचाºयांसमोरील धोका पूर्णपणे टळलेला नाही. बाधिताच्या थेट संपर्कात येत असल्यामुळे संसर्गाची भीती त्यांच्यासमोर कायम आहे. त्यामुळे अशा कर्मचाºयांचीही तपासणी होणे आता गरजेचे बनले आहे.
बाधित गावांमध्ये ४३१ दवाखानेबाधित गावांचा सर्व्हे करीत असताना तेथील खासगी रुग्णालयांची संख्याही संकलित केली जाते.प्रशासनाच्या नोंदीनुसार बाधित २५ गावांमध्ये एकूण ४३१ खासगी रुग्णालये आहेत.कºहाड शहरातील कंटेन्मेंट झोनमध्ये ११२ तर मलकापूरच्या कंटेन्मेंट झोनमध्ये सर्वाधिक म्हणजेच १६७ दवाखाने आहेत.हजारमाचीत ४४, उंब्रजला ५५ तर इतर बाधित गावांमध्ये हाताच्या बोटावर मोजण्याइतपत दवाखाने आहेत.भरेवाडी, बाबरमाची, गमेवाडी, खालकरवाडी या गावांमध्ये एकही दवाखाना नाही.
कंटेन्मेंट झोनमधीलसर्व्हेचा लेखाजोखासीझेड गावे आशा सेविका पर्यवेक्षकतांबवे २९ ५वनवासमाची २० ४मलकापूर ११४ १२उंब्रज ७८ १७साकुर्डी ३ १गोटे ८ २गमेवाडी ४ १बनवडी २१ २म्हासोली २० ४खालकरवाडी ५ १शामगाव ११ २इंदोली १७ ४मेरवेवाडी २ १भरेवाडी ३ १वानरवाडी ५ २शेणोली ८ ३