सागर चव्हाण ।पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस असणाºया डोंगर पठारावरील गावांमध्ये दिवसेंदिवस उष्णता वाढत चालली असून झºयाचे पाणी कमी होत असल्याने तीव्र पाणीटंचाईचे संकट निर्माण होऊ लागले आहे. कुसुंबीमुरा, ता. जावळी येथील आखाडेवस्तीतील ग्रामस्थांना तीव्र उन्हाचे चटके सोसत काही अंतर पायपीट करून डोक्यावरून पाणी आणावे लागत आहे.
शहराच्या पश्चिमेकडील अनेक गावांमध्ये सध्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. कुसुंबीमुरा येथील १९ कुंटुबे असणाºया आखाडेवस्तीतील साधारण २०० ते २५० लोकसंख्या असणाºया ग्रामस्थांना आत्तापर्यंत टाकीतून पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा होत होता. परंतु ज्या झºयातून पाणी टाकीत सोडले जायचे त्या झºयाचेच पाणी कमी होऊ लागले आहे. सद्य:स्थितीला झºयाचे पाणी कमी होत चालल्याने डोंगरातील एकूण चार झºयावर पाणी भरण्यासाठी महिलांची, लहान मुलांची तसेच पुरुष मंडळींचीही गर्दी होताना दिसत आहे.
पाण्याची निकड भागविण्यासाठी लोक शेतीची कामे सोडून पाण्यासाठी भटकंती करत आहेत.तसेच लग्नसराई सुरू असल्याने जवळच्या नातेवाइकांच्या लग्नकार्याला जायचे म्हटले तर पाणी भरण्याचा प्रश्न उरतोच?
यामुळे काहींना लग्नकार्याला जाण्यासाठी देखील मुकावे लागत आहे. दिवसंरात्र पाणी भरण्याचे एकच काम त्यांना करावे लागत आहे. मुलांना उन्हाळी सुटी असल्यामुळे त्यांना चार-चार किलोमीटर पाणी भरण्याच्या कामासाठी मदतीला घेतले जात आहे.रात्रभर जागरण..सध्या उन्हाळी सुटी असल्याने तसेच लग्नकायार्मुळे परगावी कामानिमित्त असणारे स्थानिक आपल्या गावी येऊ लागले आहेत. झºयाचे पाणी कमी होत असल्याने पाणी पुरत नाही. झºयावर जो लवकर जाईल त्यालाच लवकर पाणी उपलब्ध होत आहे. एक हंडा भरण्यासाठी एक तास लागत आहे.
उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने प्रशासनाकडून बोअर मिळावी, तसेच टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जावा. एखादे लग्नकार्य अथवा कार्यक्रम असल्यास चार किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागते.- ज्ञानेश्वर आखाडे, ग्रामस्थ, आखाडे