खंडाळा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी बोगद्याजवळच्या वळणावर चार वाहनांच्या झालेल्या विचित्र अपघातात चौदा जखमी झाले. यामध्ये सहलीसाठी प्रवास करत असलेल्या नागपूर येथील प्रज्ञा ट्युशन क्लासमधील नऊ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.याबाबत माहिती अशी की, नागपूर येथील प्रज्ञा ट्युशन क्लासेसने विद्यार्थ्यांसाठी सहा दिवसांच्या सहलीचे आयोजन केले होते. खासगी प्रवासी बस (एमएच ०४ जी ५६७३) मधून विद्यार्थी, शिक्षक, स्वयंपाकींसह ४७ जण प्रवास करत होते. देहू-आळंदी येथील सहल आटोपून ते बुधवारी (दि. २९) महाबळेश्वरला आले होते. महाबळेश्वर पाहून त्यांची बस औरंगाबादकडे निघाली होती. या गाडीने मध्यरात्री अकराच्या सुमारास खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर वाहतूक कोंडी झाल्याने ती बस थांबली. त्यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या दूध टँकर (एमएच ०९ बीसी ७९८५)वरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे टँकरने उभ्या खासगी बसला धडक दिली.यामुळे ही बस समोर उभ्या असलेल्या कोंबड्यांची वाहतूक करणाºया टेम्पो (एमएच ०४ एचवाय ४०४२)वर जाऊन आदळली. तसेच शेजारी उभ्या असलेला मालट्रक (एमएच ५०- १५४६)ला घासली. यामध्ये चारही वाहनांचे मोठे नुकसान झाले.बसमधील दहा विद्यार्थी, चालक व दोन महिला जखमी झाल्या. यामध्ये भाविक अशोक बांते (वय १५, रा. ओमनगर सकरदरा नागपूर), कार्तिक किशोर ठाकरे (१५), आनिक्षा विजय घायवाट (२०), अग्नी अनिल राऊत (२०), देवेंद्र रमेश चौधरी (२१), मयूरी काशिनाथ लोनगाडगे (२०), प्रणय अरुण शिवणकर (१५), हर्षल लीलाधर बांते (१५), रागिनी विनोद देवडे (२०), टँकरचालक सतीश सुभाष शेटे (३२, रा. नवे पारगाव, हातकणंगले कोल्हापूर), बसचालक बाळकृष्ण रामनरेश विश्वकर्मा (४९), बस क्लिनर चुन्नाराम सलामी (२८, रा. मध्यप्रदेश), संगीता गजानन पारतवार (६०), स्वयंपाकी कमलाबाई तोलाराम सुतोणी (६५) यांचा समावेश आहे.
खंबाटकी बोगद्याजवळ चार वाहनांचा अपघात; १४ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 12:02 AM