लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतून दुचाकी चोरणाºया टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. त्यांच्याकडून सुमारे ४ लाख ९० हजारांच्या १४ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.विवेक ऊर्फ पप्पू मानसिंग काळे (वय २७, रा. माळभाग, ता. वाळवा जि. सांगली, सध्या रा. तळबीड, ता. कºहाड), गोकूळ रामलाल पुरभे (२७, बोराखडी, ता. मोताळ जि. बुलढाणा सध्या. रा. मारुल हवेली ता. पाटण) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.तळबीड टोलनाक्यावर पेट्रोलिंग करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाºयांना विवेक काळे आणि गोकूळ पुरभे हे दोघे दुचाकीवरून फिरताना आढळले. त्यांच्या दुचाकीला नंबर नव्हता. त्यामुळे पोलिसांना संशय आला.दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याजवळ असलेली दुचाकी सात महिन्यांपूर्वी कºहाड येथील श्रीरत्न हॉस्पिटलच्या पाठीमागून चोरून आणल्याची कबुली दिली. या दोघांना पोलिसी खाक्या दाखविताच आणखी १३ दुचाकी चोरल्याची कबुली दिली. दुचाकी चोरल्यानंतर हे दोघे उंब्रज आणि पाटण परिसरात दुचाकी विकत होते. या दुचाकी खरेदी केलेल्या मालकांकडून पोलिसांनी दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.विवेक काळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, यापूर्वी त्याच्यावर खुनाचा आणि २९ दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
चौदा दुचाकी चोरणारे दोघे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 1:00 AM
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतून दुचाकी चोरणाºया टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. त्यांच्याकडून सुमारे ४ लाख ९० हजारांच्या १४ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.विवेक ऊर्फ पप्पू मानसिंग काळे (वय २७, रा. माळभाग, ता. वाळवा जि. सांगली, सध्या रा. तळबीड, ता. कºहाड), गोकूळ रामलाल पुरभे (२७, ...
ठळक मुद्दे♦ तीन जिल्ह्यांत चोरी : कºहाडात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; खुनाचाही होता आरोप♦त्याच्यावर खुनाचा आणि २९ दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल