शहरं
Join us  
Trending Stories
1
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
2
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
3
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
4
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
5
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
6
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
8
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
9
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
10
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
11
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
12
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
14
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
15
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
16
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
17
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
18
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
19
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!

फौजींनो.. सीमेवर फी भरता, येथे नको!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:28 AM

राजीव पिसाळ। लोकमत न्यूज नेटवर्क पुसेसावळी : देशाची इंचन् इंच जमीन सुरक्षित राहावी, यासाठी भारतीय जवान देशावर रात्रंदिवस जीवाची ...

राजीव पिसाळ।लोकमत न्यूज नेटवर्कपुसेसावळी : देशाची इंचन् इंच जमीन सुरक्षित राहावी, यासाठी भारतीय जवान देशावर रात्रंदिवस जीवाची बाजी लावत असतात. त्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत, याची जाण ठेवून पुसेसावळीतील एका डॉक्टरने जवानांसाठी मोफत आरोग्य सेवा देऊ केली आहे. ‘फौजी मित्रांनो.. आपण आपली फी देऊ नये. तुम्ही तुमची फी रोज बॉर्डरवर देत असता,’ असा फलकच लावला आहे.पुसेसावळीसारख्या ग्रामीण भागातील सामाजिक बांधिलकी जपणारे डॉ. प्रतापराव जगदाळे यांच्या श्रद्धा रुग्णालयात लावलेला फलक सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.काश्मिरातील पुलवामा येथे जवानांच्या वाहनांवर आतंकवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात ४० जवानांना वीरमरण आले. या घटनेमुळे आपल्या संपूर्ण देशावर दु:खाचा डोंगर कोसळला. आपापल्या भागात कँडल मार्च काढून जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आल्या. तसेच अनेक भारतीय आपल्या जवानांसाठी व शहीद झालेल्या कुटुंबीयासाठी आपापल्या परीने योगदान देत आहेत. त्यातून देशसेवा करण्याचा मनापासून प्रयत्न करत आहेत.असेच योगदान पुसेसावळी या ग्रामीण भागातील सामाजिक बांधिलकीची जान असणारे डॉ. प्रतापराव जगदाळे यांनी त्यांच्या श्रद्धा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक जवानाच्या तपासणीसाठी ‘फौजी मित्र हो, कृपया आपण आपली फी देऊ नये.तुम्ही तुमची फी रोज बॉर्डरवर देत असतात.’ अशा प्रकारचा फलक त्यांनी आपल्या श्रद्धा रुग्णालयात लावलेला आहे. त्याचप्रमाणे ते आपल्या दवाखान्यात येणाºया जवानांना मोफत उपचार करत आहेत. त्यामुळे आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. याप्रमाणे ते सामाजिक बांधिलकीचे काम करत आहेत. तरी त्यांच्या या निर्णयामुळे पुसेसावळीसह परिसरातून या उपक्रमाबद्दल कौतुक केले जात आहे.सीमेवरून कौतुकजवानांसाठी काहीतरी चांगले करण्याबाबत दीड वर्षापासून नियोजन चालले होते. ते यावर्षी ११ फेब्रुवारीपासून अंमलात आणले आहे. आतापर्यंत ३ ते ४ फौजींना मोफत उपचार केले. परिसरातील अनेक जवानांनी सीमेवरून फोन करून उपक्रमाचे कौतुक केले आहे.