शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

शेरेत दरवळणार फुलांचा सुगंध, माऊलीचा उपक्रम : गावभर तीनशे फुलझाडांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 3:55 PM

karad, road, tree, sataranews शेरे, ता. कऱ्हाड येथे गावात येणाऱ्या रस्त्यांच्या दुतर्फा १ हजार ८०० रोपांचे रोपण व नदीकाठावर चारशे झाडांच्या यशस्वी वृक्षारोपणानंतर शेरे, ता. कऱ्हाड येथील माऊली ग्रामविकास प्रतिष्ठानने गावामध्ये फुलांचा सुगंध दरवळत ठेवण्यासाठी अनोखे पाऊल उचलले आहे. प्रतिष्ठानकडून तीनशे फुलझाडांचे नुकतेच रोपण करण्यात आले आहे.

ठळक मुद्देशेरेत दरवळणार फुलांचा सुगंध, माऊलीचा उपक्रम गावभर तीनशे फुलझाडांची लागवड

वडगाव हवेली : शेरे, ता. कऱ्हाड येथे गावात येणाऱ्या रस्त्यांच्या दुतर्फा १ हजार ८०० रोपांचे रोपण व नदीकाठावर चारशे झाडांच्या यशस्वी वृक्षारोपणानंतर शेरे, ता. कऱ्हाड येथील माऊली ग्रामविकास प्रतिष्ठानने गावामध्ये फुलांचा सुगंध दरवळत ठेवण्यासाठी अनोखे पाऊल उचलले आहे. प्रतिष्ठानकडून तीनशे फुलझाडांचे नुकतेच रोपण करण्यात आले आहे.शेरे गावातील गणेश मंडळांना रोपे उपलब्ध करून देऊन त्यांची जबाबदारी त्या मंडळांकडे देण्यात आली आहे. फूलझाडे फुलल्यानंतर गावचा परिसर बहरणार असल्याने या उपक्रमाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. गेली तीन वर्षे हे प्रतिष्ठान ग्रामविकासासाठी सर्वतोपरी कार्यरत आहे. प्रतिष्ठानने गावात येणाऱ्या रस्त्यांच्या दुतर्फा सुमारे अठराशे झाडे लावून ती जगवली आहेत. वृक्षारोपणासह अल्पावधित अनेकविध सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम यशस्वी केले आहेत. त्याचबरोबर अनेक गरीब व गरजूंना मदतीचा हातही दिला आहे.

कोरोनाच्या महामारीमध्ये आडके वस्तीवर वृद्ध महिलेची झोपडी जळाली. या घटनेनंतर तत्काळ प्रतिष्ठानने मदतीसाठी आवाहन केल्यानंतर तब्बल ७५ ते ८० हजार रुपयांची मदत गोळा झाली. त्यामधून जळालेले घर नव्याने उभारून आपले कार्य प्रतिष्ठानेन अधोरेखित केले. याच कालावधीत वाया जाणाऱ्या वेळेचा सदुपयोग करत प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी दररोज सकाळी व सायंकाळी श्रमदानातून कृष्णा नदीकाठावरील बाभळी निर्मूलनाचे महत्त्वपूर्ण काम केले. यातून मोकळ्या झालेल्या तीन एकरावर चारशे दुर्मीळ फळझाडांचे रोपण केले आहे.सध्या गावात येणाऱ्या रस्त्यांच्या बाजूची अठराशे झाडे व नदीकाठी लावलेली सर्व झाडे जगली आहेत. प्रतिष्ठानने आता नवीन पाऊल उचलत गावामध्ये फूलझाडांचे रोपण करण्याची मोहीम आखली. गाव तसेच शेरे स्टेशन व गावठाण भागातील सात गणेश मंडळांच्या मदतीने फूलझाडांची लागवड केली. सुवासिक व शोभेच्या फुलझाडे रोपण मोहिमेवेळी गावातील ग्रामस्थांसह महिला व युवतींनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.

टॅग्स :environmentपर्यावरणroad transportरस्ते वाहतूकSatara areaसातारा परिसरKaradकराड