शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
4
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
5
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
6
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
7
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
8
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीनचं निराशाजनक लिस्टिंग; मात्र नंतर स्टॉक सुस्साट, पहिल्याच दिवशी अपर सर्किट
9
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
10
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
11
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
12
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
13
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
15
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
16
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
17
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
18
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
19
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
20
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."

एटीएमकार्डची अदलाबदल करून फसविणारी टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 4:35 AM

शिरवळ : एटीएम सेंटरमध्ये वृद्ध, महिलांना पैसे काढण्यात मदतीचा बहाणा करीत एटीएमधारकाची वैयक्तिक माहिती मिळवणे. त्यानंतर, हातचलाखीने एटीएमकार्डची अदलाबदल ...

शिरवळ : एटीएम सेंटरमध्ये वृद्ध, महिलांना पैसे काढण्यात मदतीचा बहाणा करीत एटीएमधारकाची वैयक्तिक माहिती मिळवणे. त्यानंतर, हातचलाखीने एटीएमकार्डची अदलाबदल करून परस्पर रक्कम काढून फसवणूक करणारी आंतरराज्य टोळी शिरवळ पोलिसांनी गजाआड केली. त्यांच्याकडून ६२ एटीएमकार्डसह गुन्ह्यात वापरलेली कार, आठ हजार १०० रुपयांची रोकड हस्तगत केली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, भोंगवली, जि. पुणे येथील निलेश शिवाजी सुर्वे हे शिरवळ येथील एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या एटीएममध्ये मित्रासमवेत रोकड काढण्यासाठी गेले होते. सुर्वे रक्कम काढत असताना पाठीमागे असलेले दोघेजण हळूच व्यवहार पाहत होते. रक्कम न निघाल्याने पावती पाहत असताना संबंधितांनी एटीएममधील कार्ड हातचलाखीने बदलले. काही वेळेनंतर निलेश सुर्वे यांच्या मोबाइलवर संदेशाद्वारे शिरवळ येथील एका बँकेच्या एटीएममधून तसेच वेळे, आसले येथील पेट्रोलपंपांवरून खात्यामधील तब्बल ५० हजार ८१० रुपये काढल्याचे निदर्शनास आले. सुर्वे यांनी तत्काळ शिरवळ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा व चोरीचा गुन्हा दखल केला.

घटनेचे गांभीर्य ओळखून फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरवळचे पोलीस निरीक्षक उमेश हजारे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे यांच्या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे व शिरवळसह विविध ठिकाणच्या सीसीटीव्हींची पाहणी केली. गुन्हेगारांच्या चोरीच्या पद्धतीचा अभ्यास करीत तपासाअंती गुन्हे हे उल्हासनगर, ठाणे येथील टोळीने केल्याचे निष्पन्न झाले. सराईत गुन्हेगारांची माहिती घेत असताना संबंधित गोव्यावरून उल्हासनगरला कारमधून निघाल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शिरवळ पोलिसांच्या पथकाने गोव्यापासून मागोवा घेत शेंद्रे, वाढेफाटा ते आनेवाडी टोलनाक्यावर सापळा रचला.

शिरवळ पोलिसांनी ते टप्प्यात येताच आनेवाडी टोलनाक्याच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पाठलाग करीत कार (एमएच ०४ ईटी ०३८९) मधील टोळीचा म्होरक्या प्रदीप साहेबराव पाटील (वय २९), किरण कचरू कोकणे (३५, दोघे रा. म्हारूळगाव ता. कल्याण जि. ठाणे), विकी राजू वानखेडे (२१, रा. भय्यासाहेब आंबेडकरनगर, उल्हासनगर, ठाणे), महेश पांडुरंग धनगर (३१, रा. ब्राह्मणपाडा, उल्हासनगर, ता. कल्याण) यांना अटक केली. पोलिसी हिसका दाखविल्यानंतर शिरवळ पोलीस ठाण्यातील तीन गुन्ह्यांसह ठाणे ग्रामीण येथील पडघा, सोलापूर येथील सांगोला, अहमदनगर येथील राहुरी, पिंपरी-चिंचवड येथील भोसरी पोलीस स्टेशन हद्दीमधील आठ गुन्हे उघडकीस आले. या घटनेची शिरवळ पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे तपास करीत आहे.

चौकट

एका फेरीत लखपती

ही टोळी २०१२ पासून कार्यरत आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश राज्यामध्ये धुमाकूळ घालत आहे. त्यांच्यावर महाराष्ट्रामध्ये २४ गुन्हे दाखल आहेत. उल्हासनगरहून कारने निघाल्यानंतर विविध ठिकाणी फसवणूक व चोरी करत एका फेरीत ते लखपती होत असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले.

चौकट

६२ एटीएमकार्ड जप्त

पोलिसांना त्यांच्याकडे तब्बल ६२ विविध बँकांचे एटीएमकार्ड आढळून आले. शिरवळ पोलिसांनी सलग दोन रात्रंदिवस ६२ एटीएमधारकांची माहिती काढताना पोलिसांनी सराईत गुन्हेगारांच्या कारनाम्यांचा उलगडा करण्यात यश मिळविले.

पोलिसांशी संपर्क साधावा

गुन्हा दाखल होताच पोलिसांना शिरवळमधील सीसीटीव्हीमध्ये गुन्हेगारांची कार आढळल्यानंतर तपासाची वेगवान सूत्रे हलवत आंतरराज्य टोळीच्या मुसक्या आवळण्यात यश आले. या टोळीमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, यादृष्टीने तपास सुरू आहे. या टोळीकडून फसवणूक किंवा चोरी झाली असल्यास संबंधितांनी पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन शिरवळ पोलीस निरीक्षक उमेश हजारे यांनी केले आहे.

फोटो १२शिरवळ-एटीएम

शिरवळ पोलिसांनी फसवणूक करणाऱ्यांनी गुन्ह्यात वापरलेल्या कारसह एटीएमकार्ड हस्तगत केले. (छाया : मुराद पटेल)