सातारा : कोरोनाच्या महामारीत सातारा तालुका कोरोनाबाधित रूग्णसंख्या व मृत्यू यामध्ये जिल्ह्यात हॉटस्पॉट ठरला आहे. आरोग्य विभागही हतबल झाला असून, सध्या तालुका प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. नेहमीच समाजहित जोपासणाऱ्या विलासपूर भागातील ४५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत लसीकरण करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी, तालुक्यात आरोग्य विभागाने लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. परंतु, कोणत्या लसीकरण केंद्रावर कोणती लस कधी उपलब्ध होईल, हे तेथील लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांनाही माहीत नसते. दरम्यान, ४५ वर्षांवरील नागरिकांना लस मिळवण्यासाठी लसीकरण केंद्रावर पहाटेपासून रांग लावून ताटकळत उभे राहावे लागत होते. यावर उपाय म्हणून विलासपूरचे माजी उपसरपंच शशिकांत पारेख व बाळासाहेब महामुलकर यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. जी. पवार यांची भेट घेऊन भागातील ज्येष्ठांना गोडोली लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. रसिका गोखले व राजश्री कुंभार तसेच लसीकरण स्टाफ यांनी सहकार्य करत विलासपूरमध्ये लसीकरण केले. यासाठी ओंकार पवार, संकेत महाडिक, परिचारिका स्वप्निली जाधव, सोनाली शिलेवंत, शुभांगी घोरपडे, नितीन भोळे यांचे सहकार्य मिळाले.
फोटो आहे
..................