कऱ्हाड : माजगाव (ता. पाटण) येथे समर्पण फाउंडेशनच्या वतीने मोफत नेत्रतपासणी शिबिर घेण्यात आले. त्यामध्ये संस्कार नेत्र रुग्णालयाच्या वतीने राहुल फासे यांनी तपासणी केली. सरपंच प्रमोद पाटील, जालिंदर जाधव यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. शिबिरात ग्रामस्थांची मोफत तपासणी करण्यात आली. दीपक भिंगारदेवे, गणेश माळी, रेश्मा जाधव, नेहा रसाळ, विशाल वीर, अमोल पाटील उपस्थित होते. शिबिरासाठी महेश पाटील, रविराज पाटील यांनी सहकार्य केले.
मालखेड तंटामुक्तीच्या अध्यक्षपदी पंकज बुरंगे
कऱ्हाड : मालखेड (ता. कऱ्हाड) येथील तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी पंकज बुरंगे, तर उपाध्यक्षपदी बाजीराव माने यांची निवड झाली. सरपंच इंद्रजित ठोंबरे, उपसरपंच युवराज पवार, ग्रामपंचायत सदस्य तानाजी माने, भीमराव होवाळ, अलका सावंत, अंजना बुरंगे, बाळूताई सुतार, नीता माने, सारिका होवाळ, पोलीस पाटील स्वाती होवाळ, दादासाहेब पाटील, ग्रामसेविका पुजारी, सोसायटीचे अध्यक्ष सुरेश पवार, उपाध्यक्ष मोहन होवाळ, आदींनी सत्कार केला.
संभाजी यादव यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
कऱ्हाड : येथील पंचायत समितीच्या वतीने संभाजी यादव यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. ॲड. उदयसिंह पाटील यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, प्राचार्य गणपतराव कणसे, सभापती प्रणव ताटे, उपसभापती रमेश देशमुख, जिल्हा परिषदेचे शिक्षण समिती सदस्य प्रदीप पाटील, गटशिक्षणाधिकारी शबनम मुजावर, शिक्षणविस्तार अधिकारी जमिला मुलाणी, केंद्रप्रमुख सुवर्णा मुसळे उपस्थित होते.
कऱ्हाडला मुलांच्या विविध स्पर्धा उत्साहात
कऱ्हाड : येथील महेंद्र स्पोर्टस क्लबतर्फे विविध वयोगटांतील मुलांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. नगरसेवक राजेंद्र माने, जनशक्ती आघाडीचे अध्यक्ष अरुण जाधव उपस्थित होते. नरेंद्र लिबे, विकास पाटील, अभय चव्हाण, भास्कर मोरे, नंदकुमार वास्के यांनी नियोजन केले. यावेळी अप्पा माने यांनी मनोगत व्यक्त केले. प्रशिक्षक महेंद्र भोसले यांनी मार्गदर्शन केले. विकास पाटील यांनी प्रास्ताविक केले. नरेंद्र लिबे यांनी आभार मानले. या स्पर्धांमध्ये विविध गटांतील खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.