तरडगाव : दिवसेंदिवस माउलींच्या पालखी सोहळ्याला जस मोठं स्वरूप प्राप्त होत आहे, तसा त्याची सेवा करणारा वर्गदेखील वाढत आहे. या काळात वारकºयांना ‘साधू संत येती घरा तोचि दिवाळी दसरा’ या मनोभावे वेगवेगळ्या मार्गाने दानधर्म करणारी मंडळी दिसतात. अशीच सेवा फलटण तालुक्यातील एक सलून कारागीर गेल्या वीस वर्षांपासून करीत आहे. पालखी सोहळ्यासाठी येणाºया वारकºयांनी या कारागिराकडून केस, दाढी मोफत करण्याची परंपरा आजही अविरतपणे सुरू आहे.संदीप सुभाष पवार ऊर्फ संजू असं या फलटण तालुक्यातील कारागिराचं नाव आहे. जेमतेम दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या ४३ वर्षीय संजू यांनी सुरुवातीला वडिलांकडेच ही कला शिकली. त्यानंतर काही दिवस फलटणला काकांकडे सराव केला. त्यानंतर आपल्या गावात १९९५ रोजी कर्ज काढून त्यांनी दुकान सुरू केले.दरवर्षी गावातून जाणाºया पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकºयांची सेवा लोक करतात मग आपणसुद्धा आपल्या व्यवसायातून का होईना थोडासा हातभार लावू या, असा निर्णय त्यांनी घेतला. त्यानंतर १९९७ मध्ये दरवर्षी पालखी काळात वारीतील सहभागी वारकºयांची केस अन् दाढी मोफत करण्याचा संकल्प करून प्रत्यक्षात तो कृतीत उतरविला.पालखी ज्यावेळी लोणंद व तरडगाव या ठिकाणी असते ते दोन दिवस संजू वारकºयांच्या सेवेत व्यस्त असतात. दरम्यानच्या काळात तो गावातील रोखीच गिºहाईकसुद्धा घेत नाही.शनिवारी गावात पालखी दाखल होण्यापूर्वी आदल्या दिवसापासून या कारागिराने आपल्या संकल्पानुसार कामास सुरुवात केली होती. गेली वीस वर्षे पालखी काळातील दोन दिवस केस-दाढीचे पैसे घेत नसल्याने दरवर्षी त्यांच्याकडेच जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद आदी ठिकाणांहून येणाºया भाविकांची चांगली ओळख झाली आहे. ते लोकदेखील त्यांच्याकडे आवर्जून येतात.संदीप पवार यांनी अनेक वर्षांपासून जपलेल्या वारकºयांच्या अनोख्या सेवेचे ग्रामस्थांमधून कौतुक करण्यात आले आहे.खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्नआळंदीहून विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन पंढरीच्या दिशेने निघालेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात लाखो वारकरी सहभागी झाले आहेत. ज्यांना पंढरपूरला जाणे शक्य होत नाही, अशी मंडळी वारीतील वारकºयांची आपापल्या परीने सेवा करण्याचा प्रयत्न करत असतात. त्याचप्रमाणे मोफत दाढी व केस कापण्यात येत आहे.साबण अन् तेलाचेही वाटपवारकरी घर सोडून कित्येक दिवस झाले आहेत. या प्रवासात ते जास्त ओझे घेऊन जाऊ शकत नाहीत. ज्यांच्याकडे ट्रकसारखे वाहने आहेत. ते ट्रकमध्ये साहित्य ठेवतात. परंतु ज्येष्ठ नागरिक, महिलांना साहित्य घेऊन चालत जाणे शक्य होत नाही. ही समस्या ओळखून काहीजण वारकºयांना तेल, साबण यासारखे साहित्यही मोफत देत आहेत.
वारीत मोफत केस अन् दाढी; वारकऱ्यांची अनोखी सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 12:02 AM