आॅनलाईन लोकमतऔंध (जि. सातारा), दि. 03 : येथील नृसिंह गणेश मंडळाच्या वतीने शिवजयंतीचे औचित्य साधुन औंध येथील ग्रामस्थांना मागेल त्या वाडी-वस्तीत, गल्लीत टँकरद्वारे पाण्याचे मोफत वाटप करण्यात येत आहे. मंडळाने पाणी टंचाईत सुरू केलेल्या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.या उपक्रमाचा प्रारंभ जेष्ठ नेते शहाजीराव देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक विकास जाधव, उद्योजक रामभाऊ देशमुख, ग्रामपंचायत सदस्य सचिन शिंदे, बादशहा मोदी, संदीप इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना माजी सरपंच शहाजीराव देशमुख म्हणाले, ह्यछत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज स्थापन करताना रयतेच्या हिताला सदैव प्राधान्य दिले. त्याच विचारांचा वसा घेऊन उन्हाच्या तीव्रतेने हैराण झालेल्या गरजू लोकांना मोफत पाणी वाटपाचा नृसिंह गणेश मंडळाचा उपक्रम कौतुकास्पद आहे. जयंती दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रम राबविण्यात येतात. मात्र, नृसिंह गणेश मंडळांच्या वतीने राबविण्यात येत असलेला उपक्रम तहानलेल्या माणसांची तृष्णा भागवणारा आहे. ग्रामस्थांनी देखील प्टंचाई लक्षात घेऊन पाण्याचा काटकसरीने वापर करावाह्ण, असे आवाहन देशमुख यांनी केले. उद्योजक अमर उर्फ रामभाऊ देशमुख यांनी प्रास्ताविक केले. (वार्ताहर)
तहानलेल्या वाड्या-वस्त्यांना टॅँकरने मोफत पाणी
By admin | Published: May 03, 2017 2:58 PM