शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

फुकटचे कनेक्शन एकदाच ‘पाजणार पाणी’!

By admin | Published: December 09, 2015 11:45 PM

दीड वर्षांचे बिल भरताना पडणार बोजा : साताऱ्यातील नवीन नळकनेक्शन अनधिकृतच; दंडाचा आकडा कदाचित मोठा

सातारा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व नगर पालिका यांच्या मार्फत नव्याने दिलेल्या नळ कनेक्शनची ग्राहकांनी पूर्तता नकेल्याने ही कनेक्शन्स अजूनही अनधिकृत मानली जात असून, जलवाहिन्यांच्या सर्व्हेनंतर नवीन घेणाऱ्याकनेक्शनलधारकाला एकत्र दंडासहित बिल भरावे लागणार आहे. गेल्या दीड वर्षांचे बिल नागरिकांना एकदमच द्यावे लागणार असल्याने सर्वसामान्यांना कर्ज काढूनच हे बिल भरावे लागणार आहे. शहरातील रस्ते डांबरीकरण करण्यापूर्वी जलवाहिनी टाकून कलेक्शन  दिली गेली होती. त्यावेळी काही मेहरबानांच्या मेहरबानीमुळे मागेल त्याला कनेक्शन देण्यात आले होते.तसेजीवनप्राधिकरणतर्फे एक अर्जदेखील नागरिकांना देण्यात आला होता. परंतु नळकनेक्शन जोडल्याने हे अर्ज धूळखात पडून राहिले. त्यामुळे ज्यांनी नळकनेक्शन जोडली आहेत. त्यांनी आत्तापर्यंत जीवन प्राधिकरणकडे कागदपत्रांची पूर्तता केली नाही. या लोकांनाही बिले अद्याप दिली नसल्याचे प्राधिकरण कार्यालयाकडून सांगण्यात आले.नगर पालिकेकडून शहरात सुमारे १३ हजार अधिकृत नळकनेक्शन जोडली गेली आहेत. या काही कनेक्शनला मीटर बसविण्यात आले आहेत तर तर कनेक्शनला अजूनही मीटर बसविण्यात आले नाहीत. पालिका आणि जीवनप्राधिकरणामध्ये पाणी आकाराबाबत निर्णय झाला नसल्याचेलले जात आहे.जीवनप्राधिकरणमार्फत सदर बझार, गोडोली, उत्तेकरनगर, देशमुख कॉलनी, करंजे, राधिका रोड, शिवराज पेट्रोलपंप या आदी भागात नवीन नळकनेक्शन दिली गेली आहेत. तसेच मीटरही बसविण्यात आले आहेत. परंतु अनेकांना ग्राहक नंबरच मिळाला नसल्याचे पुढे आले आहे. जीवनप्राधिकरणमार्फत सर्व भागात मीटरपद्धतीनेच पाणी आकार घेण्यात येणार असल्याने नव्याने घेतलेल्या कनेक्शन ग्राहकाला कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे बोलले जात आहे.अनेक नागरिकांनी अद्याप बिले का आली नाहीत, याची विचारपूस केली. मात्र त्यांना जीवनप्राधिकरणकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. जीवनप्राधिकरणमार्फत सध्या शहरात सर्वच टाक्यांचा सर्वे सुरू असून, कोणत्या टाकीत किती पाणीपुरवठा केला जातो, याचा ताळमेळ घालून या अनधिकृत नळकनेक्शनधारकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे बोलले जात आहे. (प्रतिनिधी)असे दिले जाते कनेक्शन नव्याने कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकाला सिटीर्व्हेचा उतारा द्यावा लागतो. त्यानंतर पालिकेने नाहरकत दाखला तसेच शंभर रुपयांच्या स्टँपवर प्रतिज्ञापत्र व मीटरची अनामत रक्कम भरूनच ग्राहकांना नंबर दिला जातो. त्यानंतर बिल येण्यास सुरुवात होते.कागदपत्राअभावी कनेक्शन अनधिकृतनव्याने रस्ता उखडू नये यासाठी मागेल त्याला नवीन कनेक्शन देण्यात आले. काही मेहरबानांनी अशी कनेक्शन देण्यासाठी भाग पाडल्याचे बोलले जात आहे. मात्र कादपत्रांची पूर्तता झाली नसल्याने ही कनेक्शन पुन्हा तोडण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.एकाच घराला दोन-तीन कनेक्शनशहरातील अनेक ठिकाणी एकाच घराला दोन ते तीन नळकनेक्शन दिली गेली आहेत. त्यामुळे कागदपत्रांची पूर्तता करताना अशा लोकांची डोकेदुखी वाढणार आहे.शहरात १३ हजारांहून अधिक अधिकृत नळकनेक्शन आहेत. ज्यांनी अनधिकृत नळ कनेक्शन घेतली आहेत, त्याविषयी पालिका आणि जीवनप्राधिकरणमार्फत सर्वे सुरू आहे. हा सर्वे पूर्ण झाल्यानंतरच कारवाई संदर्भात वरिष्ठ अधिकारी निर्णय घेतील.- संदीप सावंत, पाणी पुरवठा विभाग, सातारा पालिका