सातारा : किरकोळ वादातून राजवाड्यावर एका फळ विक्रेत्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. या प्रकरणी शाहुपुरी पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना रविवारी (दि. २२) घडली होती.मोसीन कादर बागवान (वय २६, रा.मंगळवार पेठ, सातारा) असे जखमी फळ विक्रेत्याचे नाव आहे. तर इरफान लाला बागवान, आस्फरा इरफान बागवान (दोन्ही रा.राजलक्ष्मी टाॅकीजच्या पाठीमागे, सातारा), जुबेर बागवान व अनोळखी एकावर गुन्हा दाखल झाला आहे.दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादातून मोसीनवर हल्ला करण्यात आला. अचानक त्याच्या पाठीत दांडक्याने मारले, तसेच तो खाली पडल्यानंतर त्याच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करण्यात आले. हा वाद सोडविण्यासाठी गाड्यावर असणारा रमजान बागवान हा आला असता, त्यालाही दांडक्याने मारहाण करण्यात आली. या घटनेची शाहुपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
फळविक्रेत्यावर धारदार शस्त्राने वार, चौघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 6:09 PM