शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

आॅलिम्पिकवीर खाशाबा जाधव संकुलाला निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 23:13 IST

कºहाड : आॅलिम्पिकवीर पैलवान खाशाबा जाधव यांच्या नावाने सातारा जिल्ह्यातील कºहाड तालुक्यातील गोळेश्वर येथील त्यांच्या जन्मगावी कुस्ती संकुल उभारण्यात येणार आहे. संकुलासाठी शुक्रवारी ग्रामपंचायतीकडून जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे जागा सुपूर्द करण्यात आली. या ठिकाणी १ कोटी ५७ लाख रुपये निधीतून भव्य असे कुस्ती संकुल होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.यावेळी जिल्हा ...

कºहाड : आॅलिम्पिकवीर पैलवान खाशाबा जाधव यांच्या नावाने सातारा जिल्ह्यातील कºहाड तालुक्यातील गोळेश्वर येथील त्यांच्या जन्मगावी कुस्ती संकुल उभारण्यात येणार आहे. संकुलासाठी शुक्रवारी ग्रामपंचायतीकडून जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे जागा सुपूर्द करण्यात आली. या ठिकाणी १ कोटी ५७ लाख रुपये निधीतून भव्य असे कुस्ती संकुल होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, तालुका क्रीडा संकुल समिती सचिव राजेंद्र ततनूर, वास्तू विशारद सारंग बेलापुरे, आॅलिम्पिकवीर खाशाबा जाधवयांचे नातू नीलेश जाधव, अमरजित जाधव, गोळेश्वरच्या सरपंच राणी जाधव, उपसरपंच प्रदीप जाधव, ग्रामपंचायत सदस्य अभिजित झिमरे, संजय जाधव, हिंमतराव जाधव, ग्रामविकास अधिकारीविकास जगताप, मंडलाधिकारी जयराम बोडके, तलाठी प्रशांत कोळी उपस्थित होते.यावेळी युवराज नाईक म्हणाले, ‘गोळेश्वर येथे उभारण्यातयेणाऱ्या पैलवान खाशाबा जाधव क्रीडा संकुलासाठी राज्य सरकारकडून १ कोटी ५७ लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. त्यापैकी एक कोटींचा निधी तालुका क्रीडा संकुलाच्या नावे वर्ग करण्यात आला आहे. उर्वरित ५७ लाखांचा निधी संकुलाचे काम सुरू झाल्यानंतर वर्ग होणार आहे. या संकुलाच्या कामाबाबत संकुल समितीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक घेतली जाणार आहे. जिल्ह्यातील उत्कृष्ट दर्जाचे व उत्तम पैलवान तयार होतील असे कुस्ती संकुल जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने या ठिकाणी उभारले जाणार आहे. या संकुलात शासनाच्या अकरा प्रकारच्या विविध योजनांतून सुविधाउभारण्यात येतील.’दरम्यान, शुक्रवारी दुपारी जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांच्यासह ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ यांनी कुस्ती संकुल उभारण्यात येणाºया जागेचीपाहणीही केली. यावेळी गोळेश्वर परिसरातील नागरिकांसह क्रीडा क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.शासन नियुक्त क्रीडा मार्गदर्शकगोळेश्वरमध्ये कुस्ती संकुल निर्माण झाल्यानंतर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे पैलवान तयार व्हावेत, यासाठी राज्य क्रीडा मार्गदर्शकांची मागणी करून पैलवानांसाठी शासन नियुक्त क्रीडा मार्गदर्शक व वस्तादांची नियुक्ती केली जाईल. याबाबत लवकरच बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी दिली.