शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

अतिरिक्त सुविधासाठी निधी उपलब्ध करून देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 4:41 AM

पाटण : ‘पाटण तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची गैरसोय होऊ नये, याकरिता कोरोना उपचार केंद्रामध्ये अतिरिक्त सुविधा निर्माण करण्यासाठी येत्या आठ ...

पाटण : ‘पाटण तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची गैरसोय होऊ नये, याकरिता कोरोना उपचार केंद्रामध्ये अतिरिक्त सुविधा निर्माण करण्यासाठी येत्या आठ दिवसांत आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून देणार असून, या सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे,’ अशी माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे.

दौलतनगर, ता.पाटण येथे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली पाटण तालुक्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या संदर्भात तालुक्यातील तालुकास्तरीय सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. याप्रसंगी त्यांनी वरीलप्रमाणे माहिती दिली. या बैठकीस उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार योगेश टोंपे, अतिरिक्त उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रणजीत पाटील, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आर. बी. पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ.कुराडे, पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे, उंब्रजचे सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड, कोयनानगरचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माळी, पाटण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी आदींची उपस्थिती होती. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, ‘सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. सातारा जिल्ह्यात सरासरी प्रतिरोज २,४०० ते २,५००चे पुढे कोरोनाबाधित होत आहेत. पाटण तालुक्यात आज तारखेला ६७४ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यातील १२४ रुग्ण उपचार घेत आहेत. तर ५४० कोरोना रुग्णांना गृहविलगीकरण करण्यात आले आहे.

सगळीकडे रुग्णालयामध्ये बेडची क्षमता संपल्या आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांना उपचाराकरिता ऑक्सिजन बेडची कमतरता भासू नये, याकरिता दौलतनगर कोरोना उपचार केंद्रामध्ये २५ व पाटण कोरोना उपचार केंद्रामध्ये ५० याप्रमाणे अतिरिक्त ऑक्सिजन बेड वाढविण्यात येणार आहेत.

पाटण तालुक्यात सुमारे २१५च्या वर ऑक्सिजन बेड उपलब्ध होतील.

(चौकट)

पाटणच्या केंद्रात व्हेंटिलेटरची सोय करणार

शंभूराज देसाई

आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजन बेडची सोय आपण पाटण, दौलतनगर व ढेबेवाडी उपचार केंद्रामध्ये करीत आहोत. त्यामुळे ऑक्सिजनअभावी कोरोना रुग्णांची गैरसोय होणार नाही, परंतु ज्या रुग्णांना व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे. त्यांना सातारा अथवा कऱ्हाड येथे व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होत नाहीत, याकरिता पाटण कोरोना उपचार केंद्रात व्हेंटिलेटरची सोय करणार असल्याचेही शंभूराज देसाईंनी यावेळी सांगितले आहे.