शहरं
Join us  
Trending Stories
1
Pope Francis: पोप फ्रान्सिस यांचं निधन, दीर्घ आजारपणानंतर व्हॅटिकन सिटी येथे घेतला अखेरचा श्वास
2
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
3
"एका रात्रीत सर्व उद्ध्वस्त, आमच्याकडे ना दुकान आहे ना जमीन; सरकारला विनंती करतो की..."
4
ब्राह्मण असून २ लग्न का केली? अभिनेत्याचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाला- "रामाच्या वडिलांच्या ३ बायका होत्या..."
5
बाजारात ५०० रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट, थोडीशी नजरचूक पडू शकते महागात, सरकारने दिला अलर्ट 
6
Ajit Pawar: 'रिक्षात पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढा', अजितदादांच्या महिलांना सूचना
7
WhatsApp वर चुकूनही असे फोटो डाउनलोड करू नका; तुमचे बँक खाते होईल रिकामे
8
भारताचे जावई अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच सासरी आले; ट्रेड वॉरची भेट देणार की नेणार?
9
८ दिवसांपासून शेअर विक्रीसाठी रांग, सातत्यानं लागतंय लोअर सर्किट; गुंतवणूकदारांवर डोक्यावर हात मारण्याची वेळ
10
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
11
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
12
१ मे पासून पैसे काढणे आणि बॅलन्स तपासण्यासह 'या' गोष्टी महाग होणार, किती असणार शुल्क?
13
"माझे सगळे कपडे फेकून दिले आणि...", १८व्या वर्षी उषा नाडकर्णींना आईने काढलेलं घराबाहेर
14
भारी! बालपणीच्या सुंदर आठवणींना नवा साज देणारी 'आई'; खेळण्यांपासून बनवते अप्रतिम फर्निचर
15
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले
16
IRCTC कडून ७ दिवसांची जपान टूर पॅकेज; कायकाय पाहायला मिळणार? किती असणार शुल्क?
17
'राम तेरी गंगा मैली' फेम मंदाकिनीला दाऊदपासून आहे मुलगा? दिल्लीच्या माजी कमिश्नर यांनी केलेला धक्कादायक खुलासा
18
BSNL चा धमाकेदार प्लान, ९०० रुपयांपेक्षा कमीत मिळतेय ६ महिन्यांची वैधता; बेनिफिट्सही आहेत खास
19
अवघं २ किलो वजन, १ हजार डिग्री तापमान, चीनने तयार केला अणुबॉम्बपेक्षा शक्तिशाली बॉम्ब, भारतासाठी धोक्याचा इशारा
20
आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली

विनाविलंब घरकुलाचा निधी मिळणार, सातारा जिल्हा परिषदेने तयार केली ऑनलाईन सुविधा 

By नितीन काळेल | Updated: March 31, 2025 19:36 IST

बांधकामाच्या टप्पानिहाय मागणी करता येणार

सातारा : शासनाकडून दिल्या जाणाऱ्या घरकुलाचा निधी मिळवताना लाभार्थ्यांना विलंब लागत होता. पण, आता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी लाभार्थ्यांना हा निधी टप्पानिहाय ऑनलाईन पध्दतीने मिळण्यासाठी सुविधा तयार केली आहे. यामुळे लाभार्थ्यांना विनाविलंब घरकुलाचा निधी मिळणार आहे.केंद्र आणि राज्य शासनाच्यावतीने बेघरांसाठी घरकुलाची योजना राबविली जाते. यासाठी निधीही दिला जातो. तर जिल्ह्यात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना ( ग्रामीण), प्रधानमंत्री जनजाति आदिवासी न्याय महा अभियान, रमाई आवास योजना (ग्रामीण), मोदी आवास घरकुल योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना (वैयक्तीक), पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना, शबरी आदिवासी घरकुल योजना, अटल बांधकाम कामगार आवास आदी घरकुल योजना राबविल्या जातात. यासाठी घरकुल मिळालेल्या लाभाऱ्श्यांना चार टप्प्यात अनुदान देण्यात येते. यासाठी लाभाऱ्श्याांना प्रक्रिया पार पाडावी लागते.घरकुलाचे टप्पानिहाय बांधकाम झाल्यावर लाभार्थी किंवा ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडून ( दुसरा, तिसरा, चौथा किंवा अंतिम) हप्त्याची मागणी पंचायत समितीत कागदपत्रे सादर करून करावी लागायची. यामुळे लाभार्थीला टप्पानिहाय बांधकामाचा हप्ता वितरण करण्यास तसेच ग्रामीण गृहनिर्माण अभियंतामार्फत बांधकामास प्रत्यक्ष भेटी देण्यास विलंब होत होता. यासाठी आता मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी मार्ग काढला आहे. लाभार्थी किंवा ग्रामपंचायत अधिकाऱ्यांमार्फत ऑनलाईनरित्या टप्पानिहाय बांधकाम हप्त्याची मागणी करण्याची सुविधा निर्माण केलेली आहे.

प्रत्येक तालुक्याला स्वतंत्र लिंक..घरकुल बांधकाम दुसरा, तिसरा, चौथा हप्ता मागणीसाठी प्रत्येक तालुक्यामार्फत स्वतंत्र गुगल फॉर्म (लिंक) तयार करण्यात आलेली आहे. यामध्ये लाभार्थी किंवा ग्रामपंचायत अधिकारी घरकुल लाभार्थींविषयी प्राथमिक माहिती भरतील. त्यामध्ये घरकुल लाभार्थीं बांधकामाच्या सद्यस्थितीतबाबत छायाचित्र आणि हप्ता मागणी प्रपत्र (लाभार्थी आणि ग्रामपंचायत अधिकारी यांच्या सहीचे) अपलोड करुन हप्ता मागणीची नोंदणी करता येणार आहे. ही सुविधा सोपी राहणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरzpजिल्हा परिषदHomeसुंदर गृहनियोजन