सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन केले असलेतरी सातारा शहरात याचा फज्जा उडाला आहे. खरेदीवेळी नागरिक गर्दी करताना दिसून येत आहेत.
कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन सुरू होता. त्यामुळे नागरिकांवर बंधने आली होती. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून शासनाने हळूहळू नियम शिथिल केले आहेत. शाळा, बाजार सुरू झाले आहेत. तसेच दुकानांच्या वेळेतही वाढ करण्यात आलेली आहे. यामुळे सातारा शहरात सोशल डिस्टन्सिगंचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. बाजार, दुकानांत खरेदीसाठी येणाऱ्या अनेक नागरिकांकडून नियमांचे पालन होत नाही. काही नागरिक तर मास्क तोंडावर न ठेवता हनुवटीवर ठेवत असल्याचेही दिसून येत आहे. यामुळे शासन नियमांना तिलांजली दिली जात आहे.
......................................
आवक वाढल्याने भाज्या झाल्या स्वस्त
सातारा : सातारा शहरात पालेभाज्यांची आवक मोठी होत आहे. त्यामुळे भाज्या काही प्रमाणात स्वस्त झाल्या आहेत. तीन आठवड्यांपूर्वी भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते. मेथी, शेपू, कोथिंबीरची जुडीही १० रुपयांच्या पुढे होती. पण, सध्या भाजीपाल्याची आवक वाढली आहे. त्यामुळे भाज्यांचे दरही कमी झाले आहेत. वांगी, टोमॅटो, दोडक्यावर दराचा परिणाम झाला आहे.
..........................................