सातारा : जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तडकाफडकी बदली केल्याचे सांगितले. मात्र, प्रत्यक्षात त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. तर त्यांच्या जागी पाली (जि. रत्नागिरी) येथील ग्रामीण रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. सुभाष चव्हाण यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. डॉ. चव्हाण यांनी बुधवारी सायंकाळी पदभार स्वीकारला.जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या शौचालयात सापडलेल्या मृत भ्रूण प्रकरणाचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. या प्रकरणानंतर डॉ. गडीकर यांच्या कारभारावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या प्रकरणाची दखल घेऊन डॉ. गडीकर यांची तडकाफडकी बदली करत असल्याचे सांगितले. मात्र, तीन दिवस झाले तरी गडीकरांच्या बदलीचे आदेश आले नाहीत. त्यामुळे त्यांना अखेर सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले.दरम्यान, कोल्हापूर मंडळाचे आरोग्य उपसंचालक डॉ. हेमंतकुमार बोरसे यांनी बुधवारी पत्र पाठवून डॉ. सुभाष चव्हाण यांच्याकडे सातारा जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा अतिरिक्त कारभार सोपविला. बुधवारी सायंकाळी डॉ. चव्हाण यांनी पद्भार स्वीकारल्यानंतर त्यांनी कोरोनाचा आढावा घेतला. रुग्णालयातील व्यवस्थापन सुधारण्याबरोबरच रुग्णांना योग्य आणि वेळेत उपचार कसे मिळतील, यावर भर देणार असल्याचे डॉ. चव्हाण यांनी यावेळी सांगितले.डॉ. चव्हाण हे पाटण तालुक्यातील राहुडे या गावचे रहिवाशी असून ते स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. मुंबई, ठाणे, कोकण, पाटण, फलटण या ठिकाणी त्यांनी यापूर्वी सेवा बजावली आहे. आत्तापर्यंत ३३ वर्षे त्यांची सेवा झाली आहे.
गडीकर सक्तीच्या रजेवर; चव्हाणांनी स्वीकारला पदभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 5:53 PM
सातारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तडकाफडकी बदली केल्याचे सांगितले. मात्र, प्रत्यक्षात त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. तर त्यांच्या जागी पाली (जि. रत्नागिरी) येथील ग्रामीण रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. सुभाष चव्हाण यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. डॉ. चव्हाण यांनी बुधवारी सायंकाळी पदभार स्वीकारला.
ठळक मुद्देगडीकर सक्तीच्या रजेवरचव्हाणांनी स्वीकारला पदभार