सातारा : सातारा शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शाहूपुरीचे ग्रामसेवक अण्णासाहेब कोळी हे आकाशवाणी झोपडपट्टी येथील विविध विकासकामाबाबत आश्वासनाचे गाजर ग्रामस्थांना दाखवत आहेत, असा आरोप करत संतापलेल्या ग्रामस्थांनी त्यांच्या गळ्यात गाजराचा हार घातला.याबाबत माहिती अशी की, आकाशवाणी माजगावकर माळ येथील वसाहतीत अनेक वर्षांपासून हजारो नागरिक वास्तव्यास आहेत. या ठिकाणी मूलभूत सुविधाही पुरवण्यात आलेल्या नाहीत. सांडपाणी रस्त्यावर आले आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्यांनी तोंड वर काढले आहे. सांडपाण्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी सातत्याने केली जात होती.याबाबत ग्रामसेवक अण्णासाहेब कोळी यांनी १ जानेवारीपूर्वी काम करण्याचे आश्वासन दिले होते. महिना होऊनही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थ तसेच रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामसेवकाच्या गळ्यात गाजराचा हार घातला.निवेदनावर सचिनभाऊ कांबळे, रवींद्र शेडगे, रवींद्र बाबर, अश्विन भिसे, पंकज माने, अनिल कोळी, अमोल बाबर, आशुतोष बोभाटे यांच्या सह्या आहेत.
ग्रामसेवकाच्या गळ्यात गाजराचा हार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 2:13 PM
सातारा शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शाहूपुरीचे ग्रामसेवक अण्णासाहेब कोळी हे आकाशवाणी झोपडपट्टी येथील विविध विकासकामाबाबत आश्वासनाचे गाजर ग्रामस्थांना दाखवत आहेत,ह्ण असा आरोप करत संतापलेल्या ग्रामस्थांनी त्यांच्या गळ्यात गाजराचा हार घातला.
ठळक मुद्देग्रामसेवकाच्या गळ्यात गाजराचा हारमहिना होऊनही दखल घेतली गेली नाही