शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

इथं चिमुकल्यांच्या जिवाशी होतोय खेळ

By admin | Published: March 26, 2017 2:14 PM

कऱ्हाडातील स्वामीबागेतील खेळण्यांची स्थिती गंभीर : डागडुजीअभावी साहित्य पडून; अनेक खेळण्यांची दुरवस्था

आॅनलाईन लोकमत

कऱ्हाड : तुटलेल्या पत्र्यांची घसरगुंडी, मोडलेल्या बागड्यांचे झोपाळे अन ढासळेलेल्या खांबावरील फिरते रिंगण अशा दुरावस्थेतील साहित्यांचे चित्र येथील दिवंगत यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळ परिसरातील स्वामीबागेत दिसत आहे. मोडतोड झालेली खेळणी ही सध्या चिमुकल्यांच्या जिवावर बेतत आहेत. परिणामी, उद्याने असूनसुद्धा त्यामध्ये खेळणाऱ्या चिमुकल्यांना आनंद मिळेनासा झाला आहे. खेळण्यासाठी आलेल्या चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचे चित्र जणू या ठिकाणी पहायला मिळत आहे.

शहरात उभारण्यात आलेल्या सार्वजनिक उद्यानामुळे शहराच्या सौदर्यांतही भर पडते. तर नागरिकांसाठी विरंगुळ्याचे ठिकाण म्हणून उद्यानाकडे पाहिले जाते. या उद्देश्याने शहरातील सुशोभीकरणात भर टाकण्यासाठी पालिकेतर्फे चार ठिकाणी आकर्षक उद्याने उभारण्यात आली. सध्या शहरात चार ठिकाणी असलेल्या उद्यानांची पालिकेकडून नियमित देखभाल व दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसते. त्यामुळेच या उद्यानातील खेळण्यांची मोडतोड झाली आहेत.

कऱ्हाड पालिकतर्फे शहरात दिवंगत यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळावर स्वामीबाग, सावरकर पुतळा परिसरात नाना-नानी पार्क, सुपरमार्केट परिसरात पी. डी. पाटील उद्यानह्ण तर यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन परिसरातील उद्यान अशा चार ठिकाणी विविध फुलझाडांसह आकर्षक खेळण्यांची उद्याने उभारण्यात आली. या उद्यानातील साहित्यांची सध्या मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे.

पालिकेने सुमारे अडीच कोटी रुपए खर्चून शनिवार पेठेत उभारलेल्या पी़ डी़ पाटील उद्यानाला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. प्रीतिसंगम बागेवरील ताण कमी करण्याच्या हेतूने बांधण्यात आलेले हे उद्यान सकाळी व सायंकाळीच सुरू ठेवण्यात येते. या ठिकाणी सुरक्षारक्षक तसेच सफाई कामगारांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, त्यांच्याकडून कितीप्रमाणात साफसफाई केली जाते, हा संशोधनाचा विषय आहे. सुमारे अडीच कोटी रुपए खर्चून तयार करण्यात आलेल्या बगीच्याचीही सद्या दुरावस्था झाली आहे.

यापेक्षा गंभीर परिस्थिती सोमवार पेठेतील नाना-नानी पार्कची आहे. या ठिकाणी लहान मुलांसाठी खेळण्यासाठी कमी आणि स्थानिक युवकांच्या गप्पा मारण्याचेच हे पार्क आहे, अशी स्थिती येथे पाहायला मिळत आहे. पार्क परिसरातच वीज वितरण कंपनीचा मोठा ट्रान्सफार्मर बसविण्यात आला आहे. त्यामुळे सायंकाळी खेळण्यासाठी येणाऱ्या मुलांच्या जिवास धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पालिकेच्या दुर्लक्षामुळे यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळी बांधण्यात आलेल्या स्वामीच्या बागेतील लॉनचे व पादचारी मागार्चे सध्या काम सुरू आहे. याठिकाणी मुलांना खेळता यावे म्हणून बसविण्यात आलेल्या खेळण्याचीही मोडतोड झालेली आहे. येथे खेळायला येणाऱ्या मुलांकडून आम्हाला खेळायचयं पणं खेळणी साहित्य कुठाय. असे सांगत मोडलेल्या झोपाळा, घसरगुंडी व गोल रिंंगण आणि खेळण्याच्या साहित्यासाहाय्याने चिमुकले खेळत आहेत. पालिकेने शहरातील दुरावस्थेत असलेल्या या उद्यानांमध्ये लवकरात लवकर सुविधा उभाराव्यात अशी, पर्यटक व नागरिकांकडून मागणी होत आहे.पावलो पावली जिवाची भिती !

बागेत खेळण्यासाठी येणाऱ्या मुलांकडून उड्या मारणे, पळणे, एकमेकांना धक्का देणे अशा प्रकारच्या कृती केल्या जातात. अशा यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनाच्या ठिकाणी असलेल्या स्वामीबागेतील खेळण्याचे साहित्य हे लोखंडी असून त्यात ते ठिकठिकाणी तुटलेले आहे. त्यामुळे यावर चिमुकले पडल्यास त्यांच्या जिवावरही बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही.बागेच्या विकासाठी पाच लाखाची तरतुद

कऱ्हाड येथील दिवंगत यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळ परिसरातील स्वामी बागेतील सुशोभिकरण, दुरूस्ती, सुरक्षा आदि घटकांसाठी पालिकेच्या सन २०१७-१८ या वर्षाच्या अर्थसंक ल्पात पाच लाख रूपयांची तरतुद करण्यात आली आहे.या सुविधांचा अभाव

१) स्वच्छ पिण्यासाठी पाणी२) खेळण्यांचे साहित्यांची डागडुजी३) स्वच्छतागृहांची गैरसोय