संदीप कणसे ।लोकमत न्यूज नेटवर्कअंगापूर : संपूर्ण महाराष्ट्रात गणेश चतुर्थीला घरोघरी, तसेच सार्वजनिक ठिकाणी गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करून गणेशोत्सव साजरा केला जातो. परंतु गणपती न बसविणारे सातारा तालुक्यातील अंगापूर हे एकमेव गाव आहे. येथे गणेशोत्सव साजरा न करता आगळावेगळा भद्र्रोत्सव साजरा केला जातो.अंगापूर व अंगापूर तर्फ या गावांतील गणेश मंदिरे ही प्राचीन असून, वास्तूशिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. अंगापूर वंदनच्या मंदिरातील गणपतीची मूर्ती ही स्वयंभू असल्याचे सांगितले जाते. या गणपतीला ‘आत्मगजानन’ असे संबोधले जाते.हे मयूरेश्वराचे उपपीठ १७०० सालच्या सुमारास अस्तित्वात आले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सुरुवातीच्या काळात ही वास्तू लहान असावी. त्यानंतर या मंदिराचा विस्तार पेशव्यांच्या काळात झाला असल्याचा अंदाज या मंदिराच्या जडणघडणीतून व्यक्त होत आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या भद्रोत्सवात सर्व जाती धर्मांचे लोक सहभागी होतात.याच मंदिरात असणाऱ्या गणेशाचा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात होत असतो. दरन्यान, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते.
अंगापुरातील एकाही घरात बसवत नाही गणपती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2019 11:43 PM