शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
2
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
3
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
4
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
5
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
6
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
7
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
8
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
9
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
10
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
11
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
12
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
13
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
14
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
15
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
16
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
17
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
18
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
19
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
20
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 

वेदांतिकाराजेंची ‘गांधीगिरी’

By admin | Published: January 29, 2015 9:10 PM

गळतीसंदर्भात नागरिक आक्रमक : बसकण मारून शाहूनगरवासीयांनी दिले गुलाबपुष्प

सातारा : शाहूनगर परिसरात अनेक ठिकाणी जलवाहिन्यांना गळती लागल्याने नागरिकांना पाणीप्रश्न भेडसावत आहे. यासंदर्भात झालेल्या चर्चेत प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता विजय मेंगे यांनी गळती काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, दोन महिने उलटूनही गळती न निघाल्याने वेदांतिकाराजे भोसले यांच्यासह नागरिकांनी गांधीगिरी करून मेंगे यांना पुष्पगुच्छ देऊन, गेट वेल सून... अशा शुभेच्छा दिल्या. शाहूनगर, जगतापवाडी परिसरातील नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा व्हावा, ड्रेनेजची सुविधा मिळावी,यासंदर्भात वेदांतिकाराजे यांच्या अध्यक्षतेखाली नागरिक आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठक झाली होती. त्यावेळी कार्यकारी अभियंता मेंगे यांनी शाहूनगर परिसरातील जलवाहिन्यांनी गळती महिनाभरात काढण्याचे आश्वासन दिले होते. दरम्यान, झालेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी बुधवारी सायंकाळी शाहूनगर येथील शिवनेरी कॉलनी येथे वेदांतिकाराजे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी नायब तहसीलदार बाळकृष्ण मोरे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता बी. ए. पाटील, अभियंता टी. बी. अष्टेकर, एस. ए. पांढरे, अभियंता सत्यवान सानप, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंता विजय मेंगे आदी उपस्थित होते. या बैठकीत नागरिकांनी दोन महिने होऊनही गळती काढली नसल्याची तक्रार केली. कामगार नसल्याचे कारण मेंगे यांनी सांगितले. त्यावेळी वेदांतिकाराजे यांनी ‘नागरिकांना अडचणी आहेत. तुम्ही तुमच्या अडचणी सांगून वेळ वाया घालवू नका,’ असे मेंगे यांना सुनावले. ‘तुमच्याकडे कामगार कमी आहेत म्हणून तुम्ही पाणी बिल कमी करता का?,’ असा सवाल वेदांतिकाराजे यांनी केला. यानंतर नागरिकांनी मेंगे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. ‘येत्या महिनाभरात शाहूनगर परिसरातील गळती न काढल्यास असहकार आंदोलनचा,’ इशारा वेदांतिकाराजे यांनी दिला.यानंतर ओढ्यावरील अतिक्रमणे हटवण्याबाबत संबंधितांना नोटीस बजावल्याचे नायब तहसीलदार मोरे यांनी सांगितले. त्रिशंकू भाग असल्याने याठिकाणी सुविधांची वानवा आहे. शाहूनगर परिसरातील सर्व समस्या सोडविण्यासाठी लवकरच जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांची भेट घेतली जाणार आहे. त्यावेळी अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून शाहूनगर परिसरातील समस्या सोडविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन वेदांतिकाराजे यांनी केले. (प्रतिनिधी)