दहिवडी : सातारा जिल्ह्यात सर्वत्र गुरुवारी उत्साही वातावरणात गणरायांचे आगमन झाले. परंतु दहिवडी पोलीस ठाणे हद्दीतील २३ गावांनी एक गाव, एक गणपतीची परंपरा जपली आहे. त्यामुळे या गावांचे कौतुक होत आहे.माण तालुक्यात गणेशोत्सव आगमनाचा मोठा जल्लोष पाहायला मिळाला. दहिवडी परिसरात शाही पद्धतीने ढोल-ताशा, लेझीम, हलगी, बँड व पारंपरिक वाद्ये यांच्या आवाजात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. बाजारपेठा देखील गजबजून गेल्या होत्या.
अनेक मोठ्या मंडळांनी वेशभूषा साकारल्या होत्या. सगळीकडे धामधुमीत गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. दहिवडी पोलीस ठाणे हद्दीत १४८ मोठ्या मंडळांनी नोंदणी केली आहे. तसेच एक गाव एक गणपतीची परंपरा देखील २३ गावांनी राखली आहे.या काळात सामाजिक एकोपा जपणारे, सामाजिक जनजागृती करणारे देखावे साकार करण्याचे आवाहन दहिवडी पोलिसांनी केले आहे.