सातारा : विलासपूर, ता. सातारा येथील गणेशनगरामध्ये सोमवारी गणेश चतुर्थीला गणपती बसविण्यासाठी फ्लॅट बंद करून गावी गेलेल्या दोन कुटुंबांची घरे चोरट्यांनी फोडून ६८ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत माहिती अशी की, शहरालगत असलेल्या विलासपूर येथील गणेशनगरमध्ये राहणारे अविनाश देशमुख व राजेंद्र कणसे ही दोन्ही कुटुंबीय गणपती बसविण्यासाठी आपापल्या मूळ गावी गेले होते. दरम्यान, चोरट्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला.
देशमुख यांच्या घरातून एलईडी टीव्ही, सव्वा तोळे वजनाची सोन्याची चैन, चांदीचे पायातील वाळे असा ३० हजार रुपयांचा मुद्देमाल तर राजेंद्र कणसे यांच्या घरातील २० हजार रुपये रोख, १८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातील टॉप्स असा ३८ हजार रुपायंचा मुद्देमाल लंपास केला. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.