वडूज : गणेश जयंतीनिमित्त श्री सिद्धिविनायक सभामंडपात श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा समाप्ती सोमवार, दि. १५ रोजी गणेश जन्म सोहळा व काल्याचे कीर्तन धार्मिक उत्साहात पार पडणार आहे. या सोहळ्याला ३८ वर्षांची परंपरा लाभली आहे.
श्री सिद्धिविनायक मंदिर सभामंडपात श्री ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह मोठ्या धार्मिक उत्साहात साजरा होतो. याच ठिकाणी सोमवार, दि. १५ रोजी गणेश जन्म सोहळा होणार आहे. पहाटे काकड आरती, सकाळी सात ते नऊ यावेळेत श्री ज्ञानेश्वरी पारायण सांगता, सकाळी नऊला काल्याचे कीर्तन, श्री गणेश जन्माचे कीर्तन , कीर्तनानंतर दुपारी रथात ‘श्रीं'ची, ज्ञानेश्वरांची मूर्ती स्थानापन्न करण्यात येणार आहे. दुपारनंतर शिवाई ग्रुपतर्फे लाडू प्रसादाचे वाटप अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंचक्रोशीतील व तालुक्यातील सर्व भाविक, भक्तांनी कोरोना काळातील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करीत सोहळ्यात सहभागी रहावे, असे आवाहन पारायण मंडळ, ग्रामस्थ व सार्वजनिक मंडळे यांच्यावतीने करण्यात आले आहे.