सातारा : कास पठारावर निर्जनस्थळी जोडप्यांना लुटमार करणाऱ्या टोळतील दोघांना पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पाच तालुक्यातून एक वर्षासाठी तडीपार केले आहे.टोळी प्रमुख सोमनाथ शिवाजी जाधव (वय २४), अक्षय नाथाजी गुजर (दोघेही रा. फडतरवाडी, ता. सातारा) अशी तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, कास पठारावर फिरण्यासाठी गेलेल्या जोडप्यांना हे दोघे मारहाण करून त्यांच्याकडील ऐवज लुटून नेत होते.
सातारा तालुका पोलीस ठाण्यात या दोघांवर विविध गुन्हे दाखल आहेत. याशिवाय या दोघांनी माहुली, बोरखळ रस्त्यावर थांबून नागरिकांना लुटल्याचेही समोर आले होते. तसेच रेल्वेमध्येही त्यांनी चोरीचे उद्योग सुरू ठेवले होते.या दोघांना वेळोवेळी सुधारण्याची संधी देण्यात आली. मात्र, त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा झाली नाही. त्यामुळे सोमनाथ जाधव आणि अक्षय गुजर याला सातारा, जावळी, कोरगाव, खटाव, कऱ्हाड या तालुक्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.
सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्यावर गुन्हासातारा : बस स्थानकासमोरील रस्त्यावर उभे राहून आरडाओरड करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी योगेश विठ्ठल चोरगे (वय ३६, रा. रविवार पेठ, सातारा) याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस कॉन्स्टेबल किशोर तारळकर यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, योगेश चोरगे हा सायंकाळी सहा वाजता बसस्थानकासमोर उभा राहून दारूच्या नशेत आरडाओरड करत होता. सार्वजनिक ठिकाणी मोठ-मोठ्याने ओरडून शांततेचा भंग केला.