शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

कुऱ्हाडीच्या धाकाने काॅपर वायर चोरणारी टोळी अटकेत; १५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

By दत्ता यादव | Published: November 03, 2023 10:53 AM

उंब्रज पोलिसांची कारवाई

दत्ता यादव, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : सडावाघापूर-जांभेकरवाडी, ता. पाटण येथे पवनचक्कीच्या कर्मचाऱ्यांना कुऱ्हाडीचा धाक दाखवून काॅपर वायर चोरून नेणाऱ्या टोळीच्या उंब्रज पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून काॅपर वायरचे तुकडे, कुऱ्हाड, लाकडी दांडके, वायर कटर, टेम्पो ट्रँव्हलर असा सुमारे १५ लाख ४० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

अनिल लक्ष्मण पवार (वय ४६) सुरेश बंडू निकम (वय ४०, (दोघेही रा. म्हारवंड, ता. पाटण), दादासो बळीराम सपकाळ (वय ५४, रा. बागलेवाडी, ता. पाटण), प्रकाश गुलाबराव जाधव (वय ५०, रा. कळंबे, ता. पाटण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, सडावाघापूर-जांभेकरवाडी येथील सुझलाॅन कंपनीच्या साईटवर कंपनीचे कर्मचारी ३० ऑक्टोबर रोजी रात्री तीन वाजता गस्त घालत होते. त्यावेळी वरील संशयितांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कुऱ्हाडीचा धाक दाखवून काॅपर वायर चोरून नेली. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी हा प्रकार तातडीने उंब्रज पोलिस आणि डायल ११२ला काॅल करून माहिती दिली. उंब्रज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत बधे यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेतली. एक पथक तयार करून ते स्वत: आरोपींच्या शोधासाठी पहाटे जांभेकरवाडी परिसरात गेले. त्यांच्यासमवेत पोलिसांची टीम आणि पाटण तालुक्यातील ढोरोशी येथील पोलिस पाटील राहुल पुजारी, जळवचे पोलिस पाटील अधिकराव पवार, जांभेकरवाडीचे पोलिस पाटील विजय कदम हे होते. या सर्वांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी जळवखिंडीजवळ टेम्पो ट्रँव्हलर उभा असलेल्या शोध पथकाला दिसला. या ठिकाणी एक आरोपी दबा धरून बसला होता. त्याला पोलिसांनी पकडले. त्याच्याकडे कसून चाैकशी केल्यानंतर संबंधित आरोपीने इतर सहकाऱ्यांची नावे सांगितली. त्यानंतर पोलिसांनी सकाळपर्यंत सर्वच आरोपींना अटक केली.

पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत बधे, पोलिस उपनिरीक्षक अनिल पाटील, हवालदार सचिन जगताप, संजय धुमाळ, नीलेश पवार आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी