सचिन मंगरुळेम्हसवड : पानवण ता. माण येथे शेतात लपवून ठेवलेला पंधरा लाख रुपये किमतीचा सुमारे साठ किलो गांजा पोलिसांनी जप्त केला. म्हसवड पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तरीत्या ही धडक कारवाई केली.चरण लाला शिंदे यांच्या शेतात गांजा ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यामाहितीवरुन पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता गांजा आढळून आला. या कारवाईत सुमारे पंधरा लाख रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी चरण लालासाहेब शिंदे यास ताब्यात घेण्यात आले. म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलिस अधीक्षक समीर शेख, पोलिस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलिस अधीक्षक गणेश कींद्रे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ, रवींद्र भोरे, पोलिस उपनिरीक्षक रवींद्र डोईफोडे, विशाल भंडारे, कॉन्स्टेबल साबीर मुल्ला, मुनीर मुल्ला, मंगेश महाडिक, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, धीरज महाडिक आदीसह पथकाने केली. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ करीत आहेत.
Satara Crime: पानवणमध्ये शेतातून १५ लाखांचा गांजा जप्त, म्हसवड पोलिस अन् स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 4:50 PM