शहरांमधील सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्यांची मोठी मदत होत असते. मात्र, साताऱ्यातील कामाठीपुरा परिसरात असलेल्या ओढ्यात मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जातो. त्यामुळे पाणी वाहून जात नसल्याने दुर्गंधी सुटत असते. (छाया : जावेद खान)
२९सातारा-कचरा
--------
एटीएममध्ये गैरसोय
वडूज : जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होत असली तरी धोका कमी झालेला नाही. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे केले जाते. बँकांमध्ये प्लास्टिक कागदाचे पडदा तयार केले आहेत. मात्र, एटीएममध्ये म्हणावी तशी काळजी घेतली जात नाही. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका संभवत असतो.
०००००००००
केळीचे दर कमी
सातारा : सध्या थंडीचे दिवस असल्याने हंगामी फळे खाणे आरोग्याला हितावह ठरते. तसेच साताऱ्याच्या बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून केळ्यांची आवक वाढली आहे. सरासरी चाळीस ते पन्नास रुपये डझन दराने केळ्यांची विक्री सुरू आहे. त्यामुळे केळ्यांना साताऱ्यातून मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे.
००००००००
आठवडा बाजारात गर्दी
सातारा : साताऱ्यातील जुना मोटार स्टॅण्ड परिसरात दर रविवारी आठवडा बाजार भरत असतो. या ठिकाणी ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने शेतकरी भाजी विक्रीसाठी घेऊन येतात. मात्र, अनेकजण कोरोनाबाबत शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करत नाहीत. अनेक जण गर्दीमध्येही विनामास्क फिरत आहेत. त्यामुळे धोका वाढत आहे.
००००००
चारभिंत परिसरात मूलभूत सुविधांचा अभाव
सातारा : अजिंक्यतारा किल्ल्याच्या कुशीत असलेल्या चारभिंत परिसरात असंख्य सातारकर दररोज फिरण्यासाठी येत असतात. मात्र, या ठिकाणी आल्यानंतर अनेक मूलभूत सुविधाही उपलब्ध नाहीत. येथे कचराकुंडी, पिण्याचे पाणी, सार्वजनिक स्वच्छतागृह सुरू करावे, अशी मागणी नागरिकांमधून वारंवार करण्यात येत आहे.
००००००
२९सातारा-बस स्टॅण्ड
प्रवाशांच्या डोक्यावर पापुद्र्यांचा धोका
सातारा मध्यवर्ती बसस्थानकात दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असते. बसस्थानकाच्या छताचा सिमेंटचा पापुद्रा ढासळत आहे. एखादे लहान मूल किंवा ज्येष्ठ नागरिकाच्या डोक्यात तो पडल्याने मोठा अनर्थ घडू शकतो. (छाया : जावेद खान)