लोणंद : लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजार आवारात गुरुवार, दि. २४ रोजी झालेल्या कांदा बाजारात गरवा १८४० पिशवी आवक झाली असल्याची माहिती लोणंद बाजार समितीचे सभापती राजेंद्र तांबे व उपसभापती दत्तात्रय बिचुकले यांनी दिली.
गरवा कांदा नंबर एक १४०० ते २००० रुपये, कांदा नं. दोन १००० ते १४००, गरवा कांदा गोल्टी ५०० ते १००० रुपये दर निघाले.
शेतकऱ्यांनी आपला शेतमाल चांगला वाळवून व निवडून लोणंद बाजार समितीमध्ये विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सचिव विठ्ठल सपकाळ यांनी केले आहे.
जनावरे बाजारात म्हैस ४०००० ते ७२००० (आवक १० नग) गाय ५२००० ते ६४००० (आवक ५० नग), शेळ्या ४२०० ते १६००० (आवक १७०० नग), मेंढ्या ६००० ते १७००० (आवक २१०० नग), बोकुड ५००० ते २५००० रुपये (आवक ६०० नग) अशा प्रकारचे बाजारभाव लोणंद बाजारात पाहावयास मिळाले.