शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

गॅस सिलिंडर एक.. किंमत मात्र वेगवेगळी वसूल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2018 11:07 PM

सातारा : अगोदरच आर्थिक मंदीत सापडलेल्या व्यावसायिकांना आणखीनच आर्थिक विवंचनेत ढकलण्यासारखे प्रकार सध्या सातारा शहरात घडत आहेत. एका कमर्शियल गॅस सिलिंडरची वेगवेगळी किंमत वसूल केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहे. मात्र, यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने नेमकी तक्रार करायची कुठे? असा प्रश्न व्यावसायिकांना पडला आहे.सातारा शहरामध्ये आता पूर्वीसारखे व्यवसाय ...

सातारा : अगोदरच आर्थिक मंदीत सापडलेल्या व्यावसायिकांना आणखीनच आर्थिक विवंचनेत ढकलण्यासारखे प्रकार सध्या सातारा शहरात घडत आहेत. एका कमर्शियल गॅस सिलिंडरची वेगवेगळी किंमत वसूल केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहे. मात्र, यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने नेमकी तक्रार करायची कुठे? असा प्रश्न व्यावसायिकांना पडला आहे.सातारा शहरामध्ये आता पूर्वीसारखे व्यवसाय चालत नसल्याची तक्रार अनेक व्यावसायिक करत असतात. त्याची कारणेही बरीच असतात. काही वैयक्तिक तर काही कारणे ही प्रशासकीय पातळीवरील असतात. त्यामुळे व्यावसायिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.सध्या साताऱ्यातील विशेषत: हॉटेल व्यावसायिकांना वेगळ्याच समस्येला सामोरे जावे लागत आहे. कमर्शियल गॅस सिलिंडरचे दर वारंवार बदलत असतात. त्यामुळे काही वेळेला व्यावसायिकांना दर निश्चित समजत नाहीत. परंतु सिलिंडर एकच असताना एकाच सिलिंडरची वेगवेगळी किंमत कशी असू शकते, असा प्रश्न व्यावसायिकांना पडत आहे.काही दिवसांपूर्वी कमर्शियल एका गॅसची किंमत १३०० रुपये होती. परंतु हाच गॅस अन्य कर्मचारी १३८० रुपये किमतीने विकत होते. ही तफावत समोर आल्यानंतर काही व्यावसायिकांनी संबंधित एजन्सीच्या कर्मचाºयांना गॅसचे वजन करून देण्याची मागणी केली. परंतु त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.वजन काटा उपलब्ध नाही. त्याचे पावती पुस्तक आमच्याजवळ नाही, अशी उत्तरे ते देऊ लागले. त्यामुळे काही व्यावसायिकांना त्यांची शंका आली. त्यांनी गॅस उचलून पाहिला असता अगदी हलका लागला. त्यामुळे त्यांच्याकडून खरेदी केलेल्या टाकीमध्ये गॅस कमी असल्याचा व्यावसायिकांकडून आरोप होत आहे. इतरवेळी हॉटेलमधील सिलिंडर १० ते १५ दिवस पुरतो. परंतु हा सिलिंडर पाच ते आठ दिवस व्यावसायिकांना पुरतो. त्यामुळे गॅसची किंमत कमी असल्यामुळे काही व्यावसायिक गॅस एजन्सीच्या कर्मचाºयांच्या आमिषाला बळी पडतात. अनेक व्यावसायिक कमी किमतीतला गॅस विकत घेतात. काही दिवसांतच आपण फसलो गेलो असल्याचे मग लक्षात येते. परंतु एकाच सिलिंडरला वेगवेगळ्या दोन किमती कशा? असा प्रश्न व्यावसायिकांमधून उपस्थित होत आहे. याची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही होत आहे.शहरातून सिलिंडर घेऊन फिरणारे.. हिंदी भाषिक..एकाच एजन्सीचे आणि एका सिलिंडरचे दर वेगवेगळे असल्याने व्यावसायिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. एका सिलिंडर गाडीतून रितसर पावती आणि गॅसची किंमत घेतली जाते. परंतु दुसºया वाहनातून फिरणाºया हिंदी भाषिक कर्मचाºयांकडून गॅसची किंमत कमी असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे अनेक व्यावसायिक त्यांच्याकडूनच गॅस विकत घेतात. परंतु त्या वजन कमी असल्याचा आरोप होत आहे.