शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

Kaas plateau: कास परिसरात गव्यांचा वावर, पर्यटकांना होतयं वारंवार दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2022 3:52 PM

पर्यटकांनी वाहनातूनच रानगव्याची छबी कॅमेऱ्यात टिपली

पेट्री : जागतिक वारसास्थळ कास पठार परिसरात पर्यटकांना रानगव्यांच्या कळपाचे वारंवार दर्शन होत आहे. सोमवारी सकाळी चक्क या महाकाय रानगव्यांचे दर्शन बहुतांशी वाहनचालक दूरवर गाडी उभी करून घेताना दिसत होते. तसेच काही वाहनचालकांनी चारचाकीतूनच या रानगव्याची छबी कॅमेऱ्यात टिपली. परंतु पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत होते.शहराच्या पश्चिमेला २५ किलोमीटर अंतरावरील कास पठार जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. नेहमीच जिल्ह्यातील, परजिल्ह्यातील बहुसंख्य पर्यटकांच्या गर्दीने कास पठार परिसर बहरलेले दिसते. त्यात कधीही पाहण्यास न मिळालेले दुर्मिळ रानगवे कास पठार परिसरात पाहायला मिळाल्याने पर्यटकांना पर्वणीच ठरत आहे.बैल कुळातील गवा सर्वात मोठा प्राणी असून, कास परिसरातील दाट, घनदाट जंगलात त्याचे कळपाने वारंवार दर्शन घडल्याचे स्थानिकांमधून बोलले जाते. यापूर्वी बहुतांशी वेळा पारंबे फाटा ते एकीव या मार्गावरून प्रवास करताना वाहनचालक उत्सुकतेपोटी या गव्यांची छायाचित्रे काढतात खरं! परंतु कोणत्याही क्षणी गव्याचा हल्ला होऊ शकतो, या हेतूने अगोदरच वाहने वळवून लावण्याची त्यांची धडपड असते.कास पठार मोठ्या प्रमाणावर जैवविविधता असलेले ठिकाण आहे. येथील निसर्गसौंदर्य, चोहोंबाजूला हिरवीगार दाट झाडी, निसर्गाचे वरदान असलेल्या कास या पर्यटनस्थळी रानगव्यांचे वारंवार झुंड दिसत असल्याने काहींना याची पर्वणी तर काहींची भंबेरी उडताना दिसत आहे. कासच्या दाट जंगलात गव्यांचा वावर आहे. पाणवठ्याच्या ठिकाणी गव्यांचा कळप बहुतांशी वेळा पाहावयास मिळतो. गेल्या एक-दोन महिन्यांत कास पठार परिसरात महाकाय रानगव्यांचे अनेकांनी वारंवार दर्शन घेतले.वन्यपशुंपासून सावध राहा...अचानक रानगवे समोर आले तर त्यांची कोणतीही चेष्टा करू नये. दगड अथवा काहीही वस्तू फेकू नये. त्याला चिडविण्याचा देखील प्रयत्न करू नये. त्यांच्या मार्गात अडथळा उभा न करता ते तेथून शांतपणे निघून जातात; परंतु त्यांना त्रास दिला गेल्यास ते हल्ला करतात. रानगवा समोर दिसल्यास पर्यटकांनी तेथून दूर जावे. दरम्यान, पर्यटनप्रसंगी वन्यपशुंपासून सावध राहावे, असे स्थानिक ग्रामस्थांतून बोलले जाते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKas Patharकास पठार