लोकमत न्यूज नेटवर्कसातारा/पाटण : जिल्ह्यात मंगळवारी गौरीबरोबरच मुसळधार पावसाचे आगमन झाले. पावसामुळे मांढरदेव घाटात दरड कोसळली. कोयना धरणात चोवीस तासांत तीन टीएमसीची वाढ झाली. त्यामुळे धरणात ९६.८६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तारळी धरण शंभर टक्के भरले आहे. धरणातून २,१८० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.गौरी येणार म्हणून साताºयाची बाजारपेठ मंगळवारी सकाळपासूनच सजली होती. मोती चौक, राजपथ, खणआळी, पाचशे एक पाटीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा शोभेच्या, सजावटीच्या वस्तू, फुलांच्या माळा, वेणी, गजरे, पाण-सुपारीचे साहित्य, मिठाईचे साहित्य विक्रीसाठी मांडले होते. साताºयात सोमवारी रात्री चांगला पाऊस झाला. त्यानंतर मंगळवारी पहाटेपासूनच ढगाळ वातावरण होते. त्यातच दुपारी बाराच्या सुमारास मुसळधार पावसाला प्रारंभ झाला.पाटण तालुक्यात सोमवारी सांयकाळपासून दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे केरा व कोयना नदी दुधडी भरून वाहत आहे. धरणातील पाण्याची आवकही वाढली आहे. चोवीस तासांत धरणातील पाणीसाठा तीन टीएमसीने वाढला आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत धरणात ९६.८९ टीएमसी पाणीसाठा झाला होता.पाटण तालुक्यात आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सोमवारी रात्रीपासून दमदार पाऊस सुरू आहे. कोयना विभागात मंगळवारी दिवसभरात १४५ मिमी, नवजा २०६ मिमी आणि महाबळेश्वरला १३४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे कोयना धरणामध्ये मंगळवारी सकाळी पाण्याची आवक प्रतीसेकंद २० हजार ७८९ क्युसेक एवढी होती. चोवीस तासांत झालेल्या पावसामुळे धरणातील पाण्याच्या पातळीत २.८९ टीएमसीची भर पडली आहे. धरणात मंगळवारी सायंकाळपर्यंत ९६.८९ टीएमसी पाणीसाठा झाला होता.धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजून ८.७७ टीएमसी पाणीसाठ्याची आवश्यकता आहे. पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास येत्या चार दिवसांत धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. पायथा वीज गृहातून सोमवारी सायंकाळी सहा वाजता होणारा पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे.जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात आणि मंगळवारी पहाटे एकूण ३३३.३ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.महाबळेश्वरला १११ मिलीमीटर पाऊसमंगळवारी, सकाळी आठपर्यंत झालेला तालुकानिहाय पाऊस मिलीमीटरमध्ये असा : सातारा ३६.१, जावळी ३१.४, पाटण ४४.४, कºहाड ३२.७, कोरेगाव १४.३, खटाव १९.०, माण ९.१, फलटण २.६, खंडाळा ६.७, वाई २५.९, महाबळेश्वर १११.१.जिल्ह्यात दोन दिवसांपासून पाऊस सुरू झाला आहे. शहरासह पश्चिम भागात पावसाचा जोर आहे. धरण, तलावाच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे.
‘मुसळधार’ घेऊन आली गौरी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 11:53 PM