पांडुरंग भिलारे- वाई -रविवार पेठ वाई येथील अशोकराव शिवराम नायकवडी शासकीय सेवेत कार्यरत होते. कृषी पदवीधर असलेले नायकवडी व त्यांच्या पत्नी शीला नायकवडी यांनी निवृत्तीनंतर वाई येथे असलेल्या शेतीत अनेक प्रयोग केले आहेत.नायकवडी यांना दहा एकर बागायत शेती आहे. त्यामध्ये हायब्रीड, टॉमॅटो, हळद या पिकांमध्ये वेगळे प्रयोग करून उच्चांकी उत्पन्न मिळविले़ त्यांच्या कामाची पोहोचपावती म्हणून १९८८ मध्ये दिवंगत वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान, पुसद यांच्या वतीने प्रयोगशील शेतकरी पुरस्कारात स्मृतिचिन्ह देऊन जवाहरलालजी दर्डा यांच्या हस्ते गौरव करण्यात आले़ अशोकराव नायकवडी यांनी १९९९ मध्ये कृषी आयुक्तालय पुणे येथून राजपत्रित अधिकारी म्हणून निवृत्ती स्वीकारल्यानतंर शेतीत विविध प्रयोग करण्याची परंपरा सुरू ठेवली़ त्यांनी बाजाराचा अभ्यास करून नियोजनबद्ध पिके घेऊन विक्रमी उत्पन्न काढत असल्याने परिसरात एक प्रयोगशील शेतकरी म्हणून ख्याती मिळविली आहे़ त्यांनी ग्रीन हाउस करून रंगीत ढब्बू मिरची परदेशात पाठविली़ तसेच हळद, ऊस व पालेभाज्यामध्ये सतत नववीन प्रयोग केले़ ते आता त्यांच्या वयाच्या ७६ व्या वर्षी ही शेतात राबत असतात व संपूर्ण शेतीचे नियोजन करीत असतात़ त्यांनी शेतात केलेले विविध प्रयोग हे शेतक-यांसाठी प्रेरणादायी आहेत़ हे दाम्पत्य सामाजिक उपक्रमातही असतात़
राजपत्रित अधिकारी : विविध संस्थांकडून झालाय गुणगौरव
By admin | Published: September 30, 2015 9:30 PM