पाटण : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आज, शनिवारी सायंकाळी ५.०४ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. रिश्टरस्केलवर याची नोंद ३.३ नोंदविली गेली. कोयना धरणासह पाटण, चिपळूण, पोफळी, वारणा खोरे परिसराला या भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. याचा केंद्रबिंदू वारणा खोरेतील जावळे गावच्या पश्चिमेला तीन किलोमीटर अंतरावर होता, तर कोयना धरणाच्या भिंतीपासून दक्षिणेस १९.२ किलोमीटरवर होता. याची खोली नऊ किलोमीटरवर होती. भूकंपाचा धक्का सौम्य असून, यामुळे धरणाच्या सुरक्षिततेला कोणताही धोका नसल्याचे कोयना धरणातील भूकंपमापन केंद्राचे तज्ज्ञ पी. डी. जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. भूकंपामुळे घरांवरील पत्रे हादरल्याने अनेक मंडळी घराच्या बाहेर उघड्या पटांगणावर जमा झाली. (प्रतिनिधी)
कोयनेत भूकंपाचा सौम्य धक्का
By admin | Published: November 23, 2014 12:31 AM