शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
3
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
4
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
5
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
6
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
7
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
8
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
9
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
10
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
11
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
12
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
13
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
14
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
15
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
16
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
17
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
18
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
19
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
20
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार

तापाने बालिका दगावली

By admin | Published: September 04, 2015 12:27 AM

दोडामार्गातील घटना : जिल्ह्यात स्वाइनचे चार संशयित; पाचजणांना डेंग्यू

कसई दोडामार्ग : दोडामार्ग म्हावळणकर कॉलनीतील वेदिका महेश म्हावळणकर या नऊ महिन्यांच्या बालिकेचा तापाने गुरुवारी मृत्यू झाला. तिला ताप आल्याने बुधवारी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले होते. दरम्यान, कणकवली आणि कुडाळ येथे स्वाइन फ्लूचे संशयित प्रत्येकी दोन असे जिल्ह्यात चार रुग्ण आढळले असून, कणकवली तालुक्यात डेंग्यूचे पॉझिटिव्ह तीन आणि कुडाळमध्ये एक व मालवणमध्ये एक असे एकूण पाच रुग्ण आढळले आहेत. वेदिका हिला गेल्या दोन दिवसांपूर्वीपासून ताप येत होता. बुधवारी तिची तब्येत खालावल्याने तिचे वडील महेश म्हावळणकर यांनी सावंतवाडी येथील खासगी दवाखान्यात औषधोपचारासाठी नेले होते, परंतु तेथे तापाचे योग्य निदान होत नसल्याने गोवा बांबुळी येथे नेण्याचा सल्ला खासगी दवाखान्यातील डॉक्टरांनी दिला. त्यामुळे तिला सायंकाळी गोवा येथे हलविले. मात्र, गुरुवारी पहाटे सहा वाजता तिचा मृत्यू झाला. तिच्या निधनाचे निदान झाले नाही. न्यूमोनियामुळे तिचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. मृतदेह म्हावळणकरवाडीत आणल्यानंतर परिसरातील लोकांनी व राजकीय पुढाऱ्यांनी म्हावळणकर यांचे सांत्वन केले. दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात अद्ययावत सुविधा व तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांची मोठी परवड होत आहे. बालरोगतज्ज्ञ हे पद गेली कित्येक वर्षे रिक्त आहे. या रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ उपलब्ध असता तर माझ्या मुलीचे प्राण वाचले असते, अशी खंत म्हावळणकर यांनी व्यक्त केली. (वार्ताहर)कणकवलीत तिघांना डेंग्यूकणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या मयूर गणेश राठोड (वय ५, रा. रवळनाथनगर) आणि लावण्या एकनाथ सावंत (वय दीड वर्षे, रा. कसवण, कलेश्वरवाडी) या दोघांमध्ये स्वाइनची लक्षणे आढळली आहेत, तर हेमंत प्रभाकर टिकले (४५, रा. शिवाजीनगर, कणकवली), बिहारी आदिवासी आदमणी (४०, रा. मसुरकर कॉम्प्लेक्स, कलमठ) आणि प्रमोद पांडुरंग साटम (४८, रा. साटमवाडी, जानवली) या तिघांच्या रक्तनमुन्याच्या स्पॉट टेस्ट डेंग्यू पॉझिटिव्ह आल्या आहेत. यापैकी बिहारी आदमणी यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. उपजिल्हा रुग्णालयात स्वाइनच्या रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. कुडाळात डेंग्यूचा दुसरा रुग्णदरम्यान, कुडाळातील सोनवडे येथे बुधवार व गुरुवारपासून कोल्हापूर व पुण्याच्या पथकाने तपासणी मोहीम राबविली. यामध्ये २५ जणांच्या रक्तांचे नमुने घेण्यात आले असून, यातील दोघेजण स्वाइन फ्लूचे संशयित असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली, तर तेजस माळकर (वय १८, रा. कोतरा), लावण्या साळगावकर (३ वर्षे, रा. चेंदवण), अक्षय सावंत (१८, रा. कुडाळ) या तिघाजणांना अधिक उपचारासाठी ओरोस येथे हलविण्यात आले, तर अनंत पारकर यांना डेंग्यूची लागण झाल्याचे निदान झाले आहे. - आणखी वृत्त /हॅलो १ वरमालवण तालुक्यात डेंग्यूचा तिसरा रुग्ण मालवण : सिंधुदुर्गात तापसरीच्या साथीनंतर आरोग्य यंत्रणेत खळबळ माजली आहे. मालवणात डेंग्यूसह स्वाइन फ्लूचा शिरकाव झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील कोळंब भटवाडी येथील राजश्री शंकर कांडरकर (६५) या महिलेला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे डेंग्यू रुग्णांची संख्या तीनवर पोहोचली आहे.