शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

देविका बनल्यात ‘देवदूत’ : ग्लॅमरस दुनियेतील ‘ती’ कोरोनाच्या लढाईत! क-हाडच्या कृष्णा रूग्णालयात कार्यरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 1:08 PM

ग्णालयात येणारा रूग्ण हा नेमका कसा आहे? त्याला कोणती लक्षणं आहेत? हे माहित नसतं. त्यामुळे प्रत्येक डॉक्टरला काळजीने काम करावे लागते. डोळ्यावाटे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त आहे. डोळ्यातील अश्रूही याला निमंत्रण देवू शकतात. डोळे येणे हे सुद्धा त्याचे लक्षण आहे.

ठळक मुद्देगायीका करतेय रूग्णांवर उपचार; इतर देशांच्या तुलनेत भारताने परिस्थिती चांगली हाताळली असली तरी नागरिकांनी गाफिल राहून चालणार नाही,

प्रमोद सुकरे

क-हाड : कोरोनाच्या संकटानं आज प्रत्येकाला घरात बसविले आहे. याला छोटा-मोठा असा फरक राहिलेला नाही. ‘ग्लॅमर’ दुनियाही या संकटाला अपवाद नाही. मात्र, गायन क्षेत्रात मोठं नाव असलेली पुण्याची देविका कºहाडात कोरोना लढाईत सहभागी होवून रूग्णसेवा करीत आहे. तीच्या या धाडसाचं, कार्याचं कौतुक करावं तेवढं थोडच.डॉ. देविका दामले या संगीत विशारद आहेत. वयाच्या पाचव्या वर्षापासून त्यांच्या गायनाच्या करिअरला सुरूवात झाली. पुणे आकाशवाणीवर बालगायिका म्हणून त्यांनी स्वत:ची ओळख तयार केली.

संगीतकार अनिल मोहिले यांनी त्यांचा आवाज ऐकल्यानंतर ख-या अर्थाने देविकाच्या गायनाच्या करिअरला सुरूवात झाली. वयाच्या चौदाव्या वर्षापासून त्यांनी व्यावसायिक गायिका म्हणून सुरूवात केली. आज त्यांनी प्लेबॅक सिंगर म्हणून स्वत:ची ओळख तयार केली असून पंडीत हृदयनाथ मंगेशकर, कल्याणजी, आनंदजी, अवधुत गुप्ते, बप्पी लहरी आदींबरोबर त्यांनी गायन केले आहे. त्याबरोबरच नेत्रचिकीत्सामध्ये पदवी घेत असलेल्या देविका सध्या क-हाडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. 

गायन आणि वैद्यकीय ही करिअरची दोन भिन्न क्षेत्र असली तरी या दोन्ही क्षेत्रांनी माझं करिअर घडवलं, असं डॉ. देविका सांगतात. ‘संगिताबद्दलचे संस्कार माझ्यावर बालवयातच झाले आहेत. आई-वडिल डॉक्टर असुनही त्यांनी संगित कलेवर प्रेम केले. त्यामुळे लहानपणापासूनच संगीत हे माझे मुख्य करिअर बनले. मी पुण्यातच एमबीबीएस पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. हे करत असताना नाट्यगीताचा डिप्लोमा केला. गंधर्व महाविद्यालयातून संगीत विशारद ही पदवी घेतली. सध्या डोळ्यांवरील उपचाराबद्दल क-हाडच्या कृष्णा महाविद्यालयात मी पदव्युत्तर शिक्षण घेत आहे.’

‘कोरोना’बाबत बोलताना डॉ. देविका सांगतात की, हे संकट म्हणजे निसर्गाने आपल्याला झुकवायला शिकविले आहे. माणसातला अहंकार कमी व्हायला याची मदत झाली आहे. रूग्णालयात येणारा रूग्ण हा नेमका कसा आहे? त्याला कोणती लक्षणं आहेत? हे माहित नसतं. त्यामुळे प्रत्येक डॉक्टरला काळजीने काम करावे लागते. डोळ्यावाटे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त आहे. डोळ्यातील अश्रूही याला निमंत्रण देवू शकतात. डोळे येणे हे सुद्धा त्याचे लक्षण आहे. त्यामुळे लोकांनी काळजी घेणे महत्वाचे आहे. इतर देशांच्या तुलनेत भारताने परिस्थिती चांगली हाताळली असली तरी नागरिकांनी गाफिल राहून चालणार नाही, असे आवाहनही डॉ. देविका करतात. 

संगीत क्षेत्राला वाहून घेतलेला परिवारडॉ. देविका यांचे वडील डॉ. प्रदीप दामले हे डोळ्यांचे डॉक्टर आहेत.  आई डॉ. गौरी दामले या मधुमेह तज्ज्ञ आहेत. तर बहीण डॉ. मोहिका या दंत चिकीत्सक आहेत. आणि हे सगळे संगीतप्रेमी असून त्याची पदवीही त्यांनी प्राप्त केली आहे. तोच वारसा देविका पुढे चालवित आहेत. त्याबरोबरच डॉ. देविका यांना पेंटिंग, एम्रॉयड्री, स्वीमिंग हेदेखील छंद आहेत.

गुरूंना कधीही विसरू शकत नाही!एमबीबीएस करीत असताना मी दोन पेपरमध्ये असणा-या कालवधीतही व्यावसायिक कार्यक्रम केले आहेत. हे सांगतानाच संगीतकार अनिल मोहिले यांनी एका कार्यक्रमात माझे गाणे ऐकले अन् त्याला चार वेळा ‘वन्समोअर’ दिला. तुझे गाणे कायम ऐकत रहावे, असे ते म्हणाले होते. तो क्षण माझ्या चिरंतन स्मरणात राहिल, असं डॉ. देविका सांगतात. गुरूंना मी कधी विसरू शकत नाही, असेही त्या म्हणाल्या. 

गाण्यानं नवी ऊर्जा मिळतेकोरोनाच्या संकटात रूग्णसेवा करताना डॉक्टरांवर प्रचंड ताण आहे.  वैद्यकीय क्षेत्रात सध्या मला माझ्या गायनाचाही खूप फायदा होतो. कामाचा ताण आला की मी गाणं गुणगुणत राहते. त्यातून मला नवी ऊर्जा मिळते. लोकांनीही गाणं ऐकत राहिलं पाहिजे. त्यामुळे आपल्यातली नकारात्मकता दूर होण्यास मदत होते, असेही डॉ देविका यांनी आवर्जुन सांगितले.

 

आमच्याकडे कोरोना संदर्भात आलेल्या रूग्णाची फंडस् एक्झामिनेशची विशेष जबाबदारी आहे. प्रत्येक रूग्णाला औषध देण्यापूर्वी डोळ्याच्या मागच्या पडद्याला काय परिणाम झाला आहे का? याची तपासणी आम्ही करीत आहोत. डॉक्टर धोका पत्करून हे सर्व करताहेत. त्यामुळे लोकांनी कोरोनाचे गांभीर्य ओळखण्याची गरज आहे.- डॉ. देविका दामले

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSocialसामाजिकcinemaसिनेमा