सणबूर
काळगाव मस्करवाडी (ता.पाटण ) येथे सोमवारी दुपारी सापळ मेठ या शिवारात बिबट्याने शेळीवर हल्ला केला. त्यात ती ठार झाली.
संगीता तानाजी मस्कर या शेळी घेऊन त्याच्या शेतात गेल्या असता हा प्रकार घडला. त्यांनी आरडाओरडा केल्याने लोक जमा झाले .त्यानंतर बिबट्या पळून गेला. मात्र, तोवर शेळी ठार झाली होती.
या परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने लोकांच्या भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने या परिसरात सापळा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, या मागणीने जोर धरला आहे.
प्रतिक्रिया
ज्या ठिकाणी घटना घडली, त्या ठिकाणी जाऊन पंचनामा केला आहे. संबंधित व्यक्तीला वनविभागामार्फत योग्य ती भरपाई देण्यात येईल, अशी माहिती वनपाल सुभाष राऊत, विशाल डुबल, मुबारक मुल्ला यांनी दिली.