शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

शेणखताला आलाय सोन्याचा भाव

By admin | Published: March 15, 2015 10:20 PM

परळी खोरे : सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांचा कल; एक हजाराला एक ट्रॉली खत

परळी : परळी खोऱ्यात गेल्या चार-पाच वर्षांपासून शेतकरी वर्गाकडून रासायनिक खताचा अमर्याद वापर झाला होता. रासायनिक खताच्या अमार्याद वापरामुळे पिकांच्या उत्पादनात वाढ न होता उलट जमिनीचा पोत खालावून शेतीक्षेत्र क्षारपड बनले जात होते. हे शेतकऱ्यांनी लक्षात घेऊन गेल्या चार-पाच वर्षांपासून शेतकरी वर्गाने कसदार जमिनीचा पोत ढासळू नये यासाठी सेंद्रिय शेती पिकविण्यावर भर दिला आहे.रासायनिक खतांच्या दरवाढीमुळे परळी भागातील शेणखताला सोन्याचा भाव आला आहे. एका ट्रॉलीच्या शेणखताचा दर हा एक हजार रुपये इतका असून, या ट्रॉलीमध्ये सर्वसाधारण तीन बैलगाड्या शेणखत बसते. त्यामुळे गाडीचा एक हजार रुपये इतका दर झाल्याने शेतकरीवर्ग धायकुतीस आला आहे. गेल्या दोन वर्षांपासूनच या खताचे दर हे गगनाला भिडले आहेत.पाच वर्षांपूर्वी ३००-४०० रुपये बैलगाडी इतका दर असणारा सध्या हजारावर पोहोचल्याने परिसरातील परळी, ठोसेघर, बनघर आदी गावांमधील शेतकरऱ्यांना शेती पिकविणे अडचणीचे ठरू लागले आहे. रासायनिक खताचे दर परवडणारे नसल्याने व रासायनिक खतापासून मिळणाऱ्या लिंक जोड खताची बचत होत नसल्याने गेल्या दोन वर्षांपासून परळीसह परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत शेतखताच्या वापरावर अधिक भर दिला आहे. (वार्ताहर)सबसिडीवरील खतांचाही घेतला लाभपरळी, ठोसेघर परिसरातील शेतकऱ्यांनी कधी नव्हे तर यंदा कृषी खात्याकडे उपलब्ध होणाऱ्या सबसिडीवरील सर्वप्रकारच्या खतांचाही सार्वधिक लाभ घेतला आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा जवळजवळ ५० टक्के शेतकऱ्यांनी कृषी खात्याकडून मिळणाऱ्या खताचा व विविध योजनांचा लाभ मिळवून घेतला आहे. रासायनिक खतांचे वाढलेले दर लक्षात घेऊन शेतकरीवर्गाने कृषी खात्याकडून मिळणाऱ्या खताला सर्वाधिक पसंती दिली आहे.