सातारा : नोटाबंदीमुळे सोने-चांदी व्यवसायाला उतरती कळा लागली. त्यातच जीएसटी लागू केला. त्यामुळे हा व्यवसाय अडचणीत आला. माझे पैसे उधारीत अडकले. खूप लोकांवर विश्वास ठेवला. त्यांना मदत केली. मात्र, प्रत्येकाने माझा विश्वासघात केला, अशी पोस्ट फेसबुकवर टाकून तरुण सराफाने रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली.कोपर्डे हवेली (ता.क-हाड) हद्दीत शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. राहुल राजाराम फाळके (३२, रा. वनवासमाची, ता. क-हाड) असे दुर्दैवी सराफाचे नाव आहे. आत्तापर्यंत मी ताठ मानेने जगलो. चूक नसताना मान खाली घालून मी जगू शकत नाही. मला कोणाला फसवायचे नव्हते. माझा तसा स्वभावही नाही. मात्र, सर्वांनी मला फसवले असून, त्यामुळे मलाही सर्वांना फसवून जावे लागत आहे. माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये, असे फाळके यांनी म्हटले आहे.कुटुंबाची जबाबदारी शिवसेनेने घ्यावी‘मी सच्चा शिवसैनिक आहे’, असे राहुल यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. ‘थापा मारणाऱ्या आणि भाषणबाजी करणाºया इतर नेत्यांपेक्षा उद्धव ठाकरे यांच्यात माणुसकी आहे. ते उत्कृष्ट वक्ते नसतील; पण जनतेच्या वेदना त्यांना समजतात. मी शिवसैनिक असून, माझ्या मृत्यूनंतर कुटुंबाची जबाबदारी शिवसेनेने आणि शिवसैनिकांनी घ्यावी’, अशी विनंती राहुल यांनी पोस्टद्वारे केली आहे.
सोनेचांदी व्यापाऱ्याची रेल्वेखाली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 2:39 PM