दहिवडी (सातारा) : रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम, या नामस्मरणाने श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचा १०४ वा पुण्यतिथी महोत्सव व समाधीवर गुलाल-फुले वाहण्याचा मुख्य सोहळा मंगळवारी पहाटे ५ वाजून ५५ मिनिटांनी पार पडला. सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक भल्या पहाटे दाखल झाले होते. गुलाल-पुष्प वाहून सोहळ्याची सांगता झाली.
भाविकांच्या गर्दीने गोंदवलेनगरी भक्तिमय वातावरणाने फुलून गेली. भाविकांची गर्दी पाहता दहिवडी, म्हसवड, सातारा मार्गाकडून होणारी वाहतूक वळविण्यात आली आली होती.
मंदिरात रात्रभर भजन, कीर्तन, प्रवर्चन, भक्तीगितांचे गायन, नामस्मरण केले जात होते. पहाटे ५ वाजून ५५ मिनिटांनी उपस्थित हजारो भाविकांनी गुलाल-पुष्प अर्पण केले. त्यानंतर या सोहळ्याची सांगता झाली.