फलटण : पवारवाडी येथे यात्रेनिमित्त आयोजित बैलगाडी शर्यतीचे योग्य आयोजन न केल्याबद्दल आणि गोंधळ उडाल्याबद्दल गावातील वीसजणांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पवारवाडी येथे नितीन वरे यांनी परवानगी घेऊन बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. तेथे पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित असताना बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी आलेल्या लोकांपैकी एक व्यक्ती त्याचे नातेवाईकांची बैलगाडी शर्यतीमध्ये उतरविण्यासाठी बैलगाडा शर्यतीचे आयोजक नितीन जगन्नाथ वरे (रा. पवारवाडी, ता. फलटण) यांना आग्रह धरत होता. त्यास नितीन वरे यांनी नकार देताच त्या दोघांमध्ये शाब्दीक वादावादी सुरु झाली. त्यांचा वाद पाहून बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी आलेले व बैलगाडा शर्यतीचे आयोजक असे दोन्ही बाजूचे लोक त्या भांडणामध्ये पडून आरडाओरडा करीत एकमेकांना धक्काबुक्की करू लागले. यामुळे सार्वजनिक शांतता बिघडवत असताना योग्य वेळी सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे व पोलीस यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.याप्रकरणी नितीन जगन्नाथ वरे, सुहास आनंदराव पवार, विकास ज्ञानदेव वरे, चंद्रकांत दत्तात्रय पवार, अजित पोपटराव हजारे, राजेंद्र भानुदास पवार, सुधीर मारुती पवार, राहुल जगन्नाथ वरे, धनराज बाळासाहेब पवार, वैभव महादेव पवार, चांगदेव वसंत चव्हाण, गणेश संभाजी चव्हाण, शिवाजी रामचंद्र कदम, बाळु सोपान जगदाळे, राजेंद्र संपत चव्हाण, तानाजी मधुकर गुरव, दत्तात्रय भाऊसो गावडे, किशोर भगवान भोसले, बाळासाहेब नारायण यादव, हनुमंत महादेव खारतोडे (सर्व रा. पवारवाडी) यांना ताब्यात घेऊन फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सर्वांना ताब्यात घेऊन नोटीस देऊन सोडण्यात आलेले आहे. पोलीस निरीक्षक सहायक फौजदार एस. एस. सूर्यवंशी तपास करीत आहेत.
फलटण तालुक्यात बैलगाडा शर्यतीत गोंधळ, पवारवाडी येथील वीसजणांविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 2:29 PM