शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची १६ जणांची तिसरी उमेदवार यादी जाहीर; मुंबईतील २ मतदारसंघाचा समावेश
2
पुण्यात भाजपाला बसणार मोठा फटका?; कसबा पेठ उमेदवार निवडीवरून पसरली नाराजी
3
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: तिकिट कापल्याने भाजपा आमदाराला अश्रू अनावर
5
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
6
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
7
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
8
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
9
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
10
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
11
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
12
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

सिंचनासाठी अजून फाटा, धरणात चांगला पाणीसाठा; जाणून घ्या जिल्ह्यातील प्रमुख धरणाचा साठा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 1:40 PM

गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यापर्यंत पाऊस होता. त्यामुळे तलाव आणि धरणांत पाणीसाठा आणखी वाढला

सातारा : जिल्ह्यात गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यापर्यंत पाऊस पडला. त्यामुळे सिंचन व पिण्यासाठी अजूनही मोठ्या प्रमाणात मागणी नसल्याने प्रमुख धरणांत चांगला पाणीसाठा शिल्लक आहे. परिणामी उन्हाळी पिकांना या पाण्याचा फायदा होणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील मोठ्या सहा धरणांची साठवण क्षमता १४९ टीएमसी आहे. सध्या या धरणात ११२ टीएमसी पाणी उपलब्ध आहे.जिल्ह्यात गेल्यावर्षी पावसाचे प्रमाण अनियमित राहिले. सुरुवातीला पावसाची दडी राहिली, तर त्यानंतर अतिवृष्टी झाली होती. परिणामी २०२० च्या तुलनेत गेल्यावर्षी धरणे उशिरा भरली. तरीही ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाऊस कोसळत होता.त्यानंतर नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसाचा दणका बसला. तर डिसेंबर महिन्यात सलग पाच दिवस पाऊस पडला. परिणामी रब्बी हंगामातील पेरणीवर ही परिणाम झाला. उशिरा पेर झाल्याने शेतकऱ्यांचा कल गहू आणि हरभरा पिकाकडे राहिला.गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यापर्यंत पाऊस होता. त्यामुळे तलाव आणि धरणांत पाणीसाठा आणखी वाढला. परिणामी रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्याची आवश्यकता भासली नाही. सध्या उन्हाळा सुरु झाला आहे. पिकांना पाण्याची गरज भासणार आहे. पण, अजूनही पाण्याची मोठी मागणी नसल्याने धरणांतून पिकांसाठी विसर्ग कमी आहे. त्यामुळे धरणांत पाणीसाठा चांगला शिल्लक राहिला आहे.     जिल्ह्यातील धोम, कण्हेर, कोयना, बलकवडी, उरमोडी, तारळी या प्रमुख सहा धरणांची पाणी साठवण क्षमता १४८.७४ टीएमसी इतकी आहे. गेल्यावर्षी यावेळी या धरणात ११०.७६ टीएमसी पाणीसाठा होता. तर यावर्षी आता तो ११२.५८ टीएमसी इतका आहे. म्हणजेच गतवर्षीपेक्षा या धरणांत जवळपास २ टीएमसीने पाणीसाठा अधिक आहे.

सध्या कण्हेर धरणातून ५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्याचबरोबर धोममधून २२८ क्युसेक, उरमोडी ३५०, कोयना धरणाच्या पायथा वीज गृहातून १,०५०, तारळीतून ३०० क्युसेक पाण्याचा नदीपात्रात विसर्ग सुरु आहे. सध्या या धरणांतून पिण्यासाठी आणि सिंचनासाठी काही प्रमाणात पाणी सोडणे सुरु आहे. पण, आगामी काळात सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासणार आहे.  

जिल्ह्यातील प्रमुख धरणाचा साठा (टीएमसीमध्ये) 

धरणेयावर्षीचा साठाटक्केवारीगतवर्षीचा साठाक्षमता
धोम९.८०६८.४११०.३०१३.५०
कण्हेर६.८७६६.३०६.३४१०.१०
कोयना७९.३४७४.१३७८.६७१०५.२५
बलकवडी३.२२७८.३२२.०२४.०८
उरमोडी८.९९८९.८६८.८४९.९६
तारळी४.३६७४.४३४.५९५.८५
टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसDamधरणWaterपाणी