सणबूर : महिंद, ता. पाटण परिसरात सुमारे पंधरा वर्षांचा बोलता न येणारा मुलगा बेवारस फिरत होता. संबंधित मुलाची विचारपूस करून राहुल शेडगे यांनी त्याला सातारा येथील बालकल्याणात विभागात दाखल केले. त्यामुळे संबंधित मुलाच्या आयुष्याला दिशा मिळाली.महिंद येथील स्मशानभूमीतील नैवेद्य खाताना एका मुलाला राहुल शेडगे यांनी पाहिले. त्यांनी त्या मुलाला त्यांच्यासोबत नेले. स्वच्छ कपडे घातले. पोटभर जेवण दिले. गत महिनाभरापासून हा मुलगा मोठी पाईप, पडीक घर, बंद शाळेत राहत होता. जेवायला मिळावे, यासाठी एखाद्या घरापुढे उभे राहून जेवणाची खूण करायचा. त्यानंतर ग्रामस्थ त्याला जेवण द्यायचे. पाऊस, हवेतील गारवा हे सर्व अंगावर झेलत तो कसा जगला असेल, हे चित्र डोळ्यासमोर येऊन या मुलाबद्दल राहुल यांना सहानुभूती वाटली. मुलाला कायमचा आधार मिळाला पाहिजे, यासाठी त्यांनी कºहाडच्या स्नेहआधार निराधार केंद्राच्या अश्विनी पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर शेडगे यांनी त्या मुुलाला साताºयाच्या बालकल्याण विभागात दाखलकेले.
स्मशानात नैवेद्य खाणाऱ्या मुलाच्या आयुष्याला मिळाली दिशा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2020 1:24 AM